एक्स्प्लोर

Rain Alert : धो-धो कोसळणार! आज राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; विदर्भात ऑरेंज अलर्ट, तर मराठवाड्यात येलो अलर्ट

Weather Update Today : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.

IMD Rain Forecast : देशासह राज्याच्या हवामानात (Weather Update) गेल्या काही दिवसात मोठा बदल पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट (Heat Wave) दिसून येत आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या (Maharashtra Rain Update) सरी बरसताना दिसत आहेत. राज्यात वीकेंडला उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

राज्यात काही भागात येलो अलर्ट

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही आज पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदमगर, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या भागात आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून येलो अलर्ट जारी करण्या आला आहे. गेल्या दोन दिवसातही राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.

कुठे ऑरेंज, तर कुठे येलो अलर्ट

अकोल्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यासोबतच नागपूर, गोंदिया आणि यवतमाळमध्येही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पावसाचा अंदाज असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

काही भागात उन्हाच्या झळा

एकीकडे पावसाची हजेरी पाहायला मिळत असली तरी, काही भागात उन्हाच्या झळा बसत आहेत. पुढील 24 तासात पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये वेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. झारखंड, तेलंगणा आणि रायलसीमा येथे वेगळ्या ठिकाणी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच आंध्र प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणीही उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

आयएमडीकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा 

एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यासह देशातील तापमानात वाढ होताना दिसत आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात पुढील दोन दिवस रात्रीच्या वेळी उकाडा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर राज्यात पुढील 24 तास पारा 40 अंशांवरच राहण्याची शक्यता आहे.

स्नेहल पावनाक
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget