एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

एका दिवसात 5 अंश तापमान वाढणार, कोकणाला उष्णतेच्या लाटेचा इशारा; काय काळजी घ्याल? 

Maharashtra Konkan Temperature : कोकणाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तापमानात वाढ झाल्यास फळे, भाज्या यावर परिणाम होऊ शकतो. आंबा-काजूवर उष्णतेचा परिणाम होऊ शकतो..

Maharashtra Konkan Temperature : अवकाळी पावसानंतर राज्यातील वातावरण तापणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस राज्यातील हवामानाचा पारा वाढणार आहे. विशेषकरुन कोकणाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. एका दिवसात चार ते पाच अंश सेल्सिअस तापमान वाढणार आहे, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केले आहे. त्याबाबतचं परिपत्रकही जारी केले आहे. त्याशिवाय या उष्णतेच्या लाटेचा फटका फळे आणि भाज्यांवर होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. 

चिपळूण-रत्नागिरी, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील काही भागात उष्माघाताचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात मात्र काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  9 मार्च रोजी सामान्य कमाल तापमानापेक्षा 4 ते 5 अंश सेल्सियसने अधिक तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तापमानात वाढ झाल्यास फळे, भाज्या यांवर परिणाम होऊ शकतो. आंबा-काजूवर उष्णतेचा परिणाम होऊ शकतो..

फळ-भाज्यांना फटका बसण्याची शक्यता 

उष्णतेच्या लाटेचा फटका फळ भाज्यांना बसण्याची शक्यता आहे. आंबा, काजू, चिकू, केळी, नारळ, सुपारी, नवीन फळबाग लागवड, कलिंगड, भाजीपाला पिके, पुळपिके त्याशिवाय कडधान्य पिके...याला फटका बसण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी फळ भाज्यांची काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागामार्फत करण्यात आले आहे. 

पशुसंवर्धन महत्वाचं - 

जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी जनावरांना ताजे स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात देण्यात यावे. तसेच उष्णणतेचा ताण कमी करण्यासाठी वैरणीवर एक टक्के गुळपाणी आणि 0.5 टक्के मीठ यांचे स्वतंत्र द्रावण करुन शिंपडावे.. उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्याकरिता दुपारच्या वेळी जनावारांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे. दुपारच्या वेळीस जनावारांची सावलीत सोय करावी. कुकुटपालन शेडमध्ये पाण्याची भांडी वाढवावी.. त्याशिवाय छप्पर गवताने झाकावे. 

शेतातील कामे करताना? 

दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे शक्यतो दुपारच्या वेळी शेतात जाऊ नये. दुपारच्या वेळी शेतात काम करणे टाळावे. कामाच्या ठिकाणी स्वच्छ पाणी ठेवावे... पाण्याचे सेवन करावे.. शक्यतो शेतातील कामे सकाळी आणि सांयकाळी चार नंतरच करावे... 

काय काळजी घ्यावी - 

दुपारच्या वेळी घराबाहेर जाणं टाळावे.. जास्तीत जास्त पाणी प्यावे. जर उन्हाळ्यात शरिराचे तापमान सतत वाढत असेल, डोके दुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, मळमळ किंवा निराशपणा जाणवत असेल तर त्वरीत डॉक्टरांकडे जावे. 

उष्माघातामध्ये काय करावे, काय करु नये ?

उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ आणि अति उष्णता असल्यानंतर जेवण तयार करु नका.
विशेष करुन दुपारी 12 ते दुपारी 3 या दरम्यान घराबाहेर उन्हात जाऊ नका.
सतत पाणी पीत राहा जेणेकरुन शरीर हायड्रेट राहिल.
ओरल रिहायड्रेशन सॉल्यूशन (ओआरएस) याचा वापर करा.
त्याशिवाय घरात तयार केलेले लिंबू-पाणी, छास, लस्सी, ज्यूस याचं जास्तीत जास्त सेवन करा.
घरातून दुपारच्या वेळी बाहेर येऊ नका. टरबूज, कलिंगड, संत्रा यासारख्या फळांचं सेवन करा.
तसेच सुती कपडे परिधान करा. गडद रंगाचे कपडे परिधान करु नका. उन्हात जाताना डोकं झाका.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget