Maharashtra Weather Forecast : पुण्यासह महाराष्ट्रात कधी दाखल होणार मान्सून? पुणे वेधशाळेनं सांगितलं मान्सून लांबण्याचं कारण
येत्या तीन दिवसांत मान्सून पुण्यासह महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळं यंदा मान्सूनचं महाराष्ट्रातलं आगमन लांबणीवर पडलं होतं.
Maharashtra Weather Forecast : राज्यातलं आगमन रखडलेल्या मान्सूनला येत्या काही दिवसांत पुन्हा गती मिळण्याची शक्यता आहे. मोसमी वाऱ्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सध्या पोषक स्थिती तयार झाली आहे. त्यामुळं येत्या तीन दिवसांत मान्सून पुण्यासह महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळं यंदा मान्सूनचं महाराष्ट्रातलं आगमन लांबणीवर पडलं होतं. पण मान्सूनला पुढे सरकण्यासाठी लागणारं अनुकूल वातावरण आता तयार झालं आहे. त्यामुळं राज्याच्या काही भागांमध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बुधवारपासून पाहायला मिळेल.
येत्या 23 जूनपासून राज्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणी करताना घाई करू नये, हवामानाचं पूर्वानुमान पाहून मगच पेरणी करावी असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पुण्यासह महाराष्ट्रात बुधवारपासून पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण खऱ्या अर्थानं 23 जूनपासून सुरू होणारा हा पाऊस जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सलग सुरु राहण्याची शक्यता आहे. यंदा पाऊस ऑक्टोबरपर्यंत राज्यात राहण्याची शक्यता आहे.
मोचा आणि बिपरजॉय ही चक्रीवादळामुळे पाऊस लांबला...
एरवी एक जूनला मॉन्सून केरळात आणि सात ते दहा जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात दाखल होऊन पावसाला सुरुवात झालेली असते . मात्र यावर्षी मॉन्सूनने सर्व अंदाज चुकले आहे. याला मोचा आणि बिपरजॉय ही चक्रीवादळं या परिस्थितीला कारणीभूत आहेत. बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरात आणि राजस्थानमध्ये दाणादाण उडवून दिली होती . त्यामुळं मॉन्सून पुन्हा कधी सक्रिय होणार याचा नव्याने अंदाज बांधण्याची वेळ हवामान विभागावर आली आहे.
पुण्यात पुढील पाच दिवस वातावरण कसं असेल?
20 जून 2023-
आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
21 जून 2023-
आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता.
अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता.
22 जून 2023
आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
23 जून 2023
आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
24 जून 2023
आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी / संध्याकाळी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
25 जून 2023
आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी / संध्याकाळी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
26 जून 2023
आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.