एक्स्प्लोर

Maharashtra Monsoon : देशात मान्सून पूर्व पावसाचा अंदाज, महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता

Maharashtra Weather Alert : मुंबई, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

Maharashtra Monsoon Alert : देशात मान्सून दाखल होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. हवामान खात्याने आज राज्यासह देशाच्या बहुतेक भागात मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवली केली आहे. भारतीय हवामान खात्याने संपूर्ण दिल्ली आणि लगतच्या परिसरात भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच महाराष्ट्रातही मान्सून पूर्व पावसाची हजेरी लागण्याच्या अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाचा अंदाज

मुंबई, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांशिवाय इतर सर्व जिल्ह्यांमध्ये वादळ, विजांचा कडकडाट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

राजधानी दिल्लीत पहाटे पावसाला सुरुवात

देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हवामानात बदल झाला आहे. त्यामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. आज, 31 मे रोजी पहाटे दिल्लीच्या काही भागात पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, दिल्लीत 4 जूनपर्यंत हवामान स्वच्छ राहील, तर बिहार, झारखंड, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये पावसामुळे तापमानात घट होईल.

कुठे ऊन, कुठे पाऊस

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांच्या स्थिरतेनंतर नैऋत्य मान्सून यावेळी बंगालच्या उपसागरात पोहोचला आहे. मान्सून आता वेगाने पुढे सरकत आहे, त्यामुळे हवामानात सातत्याने बदल होत आहेत. महाराष्ट्रातही कधी पाऊस पडतो तर कधी कडक ऊन पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेच्या लाटेची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. राज्यासह देशात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. 

मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता

मुंबई आणि त्याच्या लगतच्या किनारी भागातील लोकांना कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे. तर येत्या 24 तासांत मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने रायगड, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, अमरावती, अहमदनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, परभणी, बीड, जालना, हिंगोली, नांदेड, अकोला, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशीम येथे पावसाची शक्यता वतवली आहे. यवतमाळ, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबादच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर बीड आणि जालना वगळता इतर जिल्ह्यांसाठीही 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
Vidhansabha Election Result 2024 : पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMahesh Tapase NCP :  आम्हाला 160 पेक्षा जास्त जागा मिळतीलBJP Strike Rate : मागील पाच निवडणुकांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
कोल्हापुरात पहिला विजयी गुलाल इचलकरंजीत! शेवटपर्यंत कोणाची घालमेल सर्वाधिक होणार? कोणत्या मतदारसंघात किती फेऱ्या होणार??
Vidhansabha Election Result 2024 : पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
Embed widget