एक्स्प्लोर

Water Crisis : पाणीसंकट अधिक गडद! राज्यभरात साडेतीन हजाराहून अधिक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा; गुलाबराव पाटलांची माहिती

राज्यभरात ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई अधिक तीव्र स्वरूपात आहे, त्या ठिकाणी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. 

State Water Crisis: एकीकडे उष्णतेचा पारा रोज नवे उच्चांक गाठत असताना, दुसरीकडे मात्र राज्यभरातील धरणसाठ्यातही मोठी घट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील पाणीसंकट (Water Crisis) अधिक गडद झाल्याने नागरिकांना एप्रिल महिन्यातच पाण्यासाठी मोठी वनवण करावी लागत आहे. तर संभाव्य पाणीबाणी लक्षात घेता सर्व जिल्ह्याती प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. राज्यभरात ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई अधिक तीव्र स्वरूपात आहे, त्या ठिकाणी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली आहे. 

राज्यभरात साडेतीन हजाराहून अधिक ठिकाणी पाण्याचे टँकर

यंदा राज्यभरात अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणत पाऊस झाल्याने त्याचा थेट परिणाम हा धरण साठ्यावर झाला आहे. परिणामी, ऐन उन्हाळ्यात धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने गरजेप्रमाणे पाणी पुरवठा होऊ शकत नाहीये. त्यात यंदा उन्हाची तीव्रता ही अधिक असल्याने आहे तो पाणीसाठा ही वेगाने घटत असल्याने पाणी टंचाईचे सावट पसरले आहे. मात्र, असे असले तरी राज्यभरात ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई अधिक तीव्र स्वरूपात आहे, त्या ठिकाणी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. सध्या राज्यभरात साडेतीन हजाराहून अधिक ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू असून पुढील काळात गरज पडल्यास त्याची संख्या अजून वाढू शकणार असल्याचा अंदाज आहे. तर ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे त्या ठिकाणी पाण्याची बचत करण्याचा सूचनाही देण्यात आल्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. 

पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन 

राज्यात ज्या ठिकाणी आवश्यकता वाटल्यास त्या ठिकाणच्या खासगी विहिरीही अधिग्रहित करण्यात येणार आहे. पाऊस सुरू होण्यासाठी अद्याप दोन महिने कालावधी असल्याने आहे ते पाणी अतिशय काटकसरीने वापरण्याचे नियोजन सरकार करत आहेत. तर सध्या धरणसाठा असलेले पाणी केवळ पिण्याच्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येतं असल्याचेही लाबराव पाटील म्हणाले. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, ते देशाचं काम आहे अस समजून त्याच नियोजन करून सहकार्य करण्याचं आवाहन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. 

हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण 

छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवते आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना दीड ते दोन किमी पर्यंत पायपीट करावी लागतेय. जीवघेणी कसरत करत खोल विहिरीतून पाणी भरावं लागतंय. लहान मुलं, वृद्ध महिलाही जीवावर उधार होवून पाण्यासाठी जीवघेणी कसरत करतायत. एरवी पाण्याचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयगावात यंदा मात्र दुष्काळाची स्थिती निर्माण झालीये. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचा हा मतदारसंघ आहे. मात्र, कुणालाच या पाणीसंकटाकडे लक्ष द्यायला वेळ नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय.  

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget