एक्स्प्लोर

Maharashtra VidhanSabha Speaker : राहुल नार्वेकर 20वे विधानसभा अध्यक्ष; सासरे अन् जावयाकडे विधिमंडळाच्या 'चाव्या'!

Maharashtra Vidhan Sabha Opposition Leader :महाराष्ट्राच्या विधिमंडळात सासरे आणि जावयांचं 'राज्य' असणार आहे. कारण विधानसभा आणि विधानपरिषद या दोन सभागृहाच्या 'चाव्या' आता सासरे आणि जावयाच्या हाती आल्या आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. आता महाराष्ट्राच्या विधिमंडळात सासरे आणि जावयांचं 'राज्य' असणार आहे. कारण विधानसभा आणि विधानपरिषद या दोन सभागृहाच्या 'चाव्या' आता सासरे आणि जावयाच्या हाती आल्या आहेत. विधानसभेत जावई राहुल नार्वेकर तर विधानपरिषदेत त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत.

नार्वेकर ते राज्याच्या आणि देशाच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. ते राज्य विधानसभेचे 20 वे अध्यक्ष आहेत. आज झालेल्या विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मतं मिळाली. तर राजन साळवी यांना 107 मतं मिळाली. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले. आता अध्यक्षांची भूमिका आता महत्वाची असणार आहे. कारण उद्या शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी देखील पार पडणार आहे. 

राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करावी असा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला त्याला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिलं. तर चेतन तुपे यांनी साळवी यांचा प्रस्ताव मांडला, तर संग्राम थोपटे यांनी अनुमोदन दिलं. नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावे लागणार आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अध्यक्षांची निवड झाली आहे. शिंदे सरकारकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं तर महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणाला राजन साळवी यांना मैदानात उतरवलं होतं. एकनाथ शिंदे गट आणि भाजपचं संख्याबळ पाहता राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्ष होतील हे जवळपास निश्चित होतं.

विधानमंडळावर सासरे आणि जावयांचं 'राज्य'

राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानं विधानमंडळावर सासरे आणि जावयांचं 'राज्य' असणार आहे.  विधानसभेत जावई राहुल नार्वेकर तर विधानपरिषदेत त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती म्हणून जावई आणि सासरे अशी जोडी पाहायला मिळाली आहे. 

राहुल नार्वेकर हे 45 वर्षांचे आहेत. ते विधानसभेचे आजवरचे सर्वात तरूण अध्यक्ष ठरले आहेत. राहुल नार्वेकर हे एकेकाळचे शिवसेनेचे खंदे नेते होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत होते. आता ते भाजपाचे आमदार आहेत. राहुल नार्वेकर यांना भाजपाने विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करत आणखी एक मास्टरस्ट्रोक खेळला आहे. राहुल नार्वेकर हे मुंबईतील कुलाबा मतदार संघाचे आमदार आहेत.  

कोण आहेत राहुल नार्वेकर (Know About Rahul Narvekar) 

शिवसेनेतून राजकीय प्रवासाला सुरुवात 
तीन वर्ष राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य
2019 च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश
2019 साली कुलाबा मतदारसंघातून आमदार  
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकरांचे जावई  

बहुमत चाचणीवेळी अध्यक्षांची भूमिका महत्वाची 

विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवाराची घोषणा झालेली नव्हती. शेवटी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी चर्चा करुन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब केला. नवनियुक्त शिंदे सरकारची बहुमत चाचणी दोन दिवसाच्या अधिवेशनात होणार आहे. त्याआधी विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांनी बाजी मारली आहे. शिंदे गट आणि भाजपच्या बहुमत चाचणीवेळी अध्यक्षांची भूमिका महत्वाची असणार आहे. 

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhavesh Bhinde: ड्रायव्हरला सिमकार्ड आणायला सांगून लोणावळ्यातून सटकला, गुजरातमध्ये नातेवाईकाच्या घरी मुक्काम, भावेश भिंडे कसा फरार झाला ?
ड्रायव्हरला सिमकार्ड आणायला सांगून लोणावळ्यातून सटकला, गुजरातमध्ये नातेवाईकाच्या घरी मुक्काम, भावेश भिंडे कसा फरार झाला ?
Malaika Arora : पन्नाशीतही मलायका अरोरासारखं फिट राहायचंय? तर मग 'हा' डाएट नक्की फॉलो करा
पन्नाशीतही मलायका अरोरासारखं फिट राहायचंय? तर मग 'हा' डाएट नक्की फॉलो करा
Dadar Public Reaction on Lok Sabha : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? दादरकरांची तुफान खडाखडी
राज ठाकरे की उद्धव ठाकरे? दादरकरांची तुफान खडाखडी
Russia Bulava Missile: पुतिन अणुहल्ला करण्याच्या तयारीत? रशियाच्या ताफ्यात शक्तिशाली 40 फुट 'बुलावा' क्षेपणास्त्र दाखल; जगाची धाकधूक वाढली
पुतिन अणुहल्ला करण्याच्या तयारीत? रशियाच्या ताफ्यात शक्तिशाली 40 फुट 'बुलावा' क्षेपणास्त्र दाखल; जगाची धाकधूक वाढली
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 17 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 11 AM : 17 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDadar Public Reaction on Lok Sabha : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? दादरकरांची तुफान खडाखडीABP Majha Headlines : 10 AM : 17 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhavesh Bhinde: ड्रायव्हरला सिमकार्ड आणायला सांगून लोणावळ्यातून सटकला, गुजरातमध्ये नातेवाईकाच्या घरी मुक्काम, भावेश भिंडे कसा फरार झाला ?
ड्रायव्हरला सिमकार्ड आणायला सांगून लोणावळ्यातून सटकला, गुजरातमध्ये नातेवाईकाच्या घरी मुक्काम, भावेश भिंडे कसा फरार झाला ?
Malaika Arora : पन्नाशीतही मलायका अरोरासारखं फिट राहायचंय? तर मग 'हा' डाएट नक्की फॉलो करा
पन्नाशीतही मलायका अरोरासारखं फिट राहायचंय? तर मग 'हा' डाएट नक्की फॉलो करा
Dadar Public Reaction on Lok Sabha : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? दादरकरांची तुफान खडाखडी
राज ठाकरे की उद्धव ठाकरे? दादरकरांची तुफान खडाखडी
Russia Bulava Missile: पुतिन अणुहल्ला करण्याच्या तयारीत? रशियाच्या ताफ्यात शक्तिशाली 40 फुट 'बुलावा' क्षेपणास्त्र दाखल; जगाची धाकधूक वाढली
पुतिन अणुहल्ला करण्याच्या तयारीत? रशियाच्या ताफ्यात शक्तिशाली 40 फुट 'बुलावा' क्षेपणास्त्र दाखल; जगाची धाकधूक वाढली
सोनिया सेनेच्या गुलामीसाठी उद्धव ठाकरेंकडून भगव्याचा अवमान, भाजपचा पलटवार, संघाच्या निशाणाला फडकं म्हटल्याने हल्ला
सोनिया सेनेच्या गुलामीसाठी उद्धव ठाकरेंकडून भगव्याचा अवमान, भाजपचा पलटवार, संघाच्या निशाणाला फडकं म्हटल्याने हल्ला
Free OTT Platforms List  : मोफत चित्रपट, वेबसीरिज पाहायचे आहेत? या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन  करण्याची गरज नाही; पाहा यादी
मोफत चित्रपट, वेबसीरिज पाहायचे आहेत? या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन करण्याची गरज नाही; पाहा यादी
Marathi Actor : लोकप्रिय मराठी अभिनेत्याला मातृशोक; पोस्ट शेअर करत दिली माहिती
लोकप्रिय मराठी अभिनेत्याला मातृशोक; पोस्ट शेअर करत दिली माहिती
महायुतीच्या सभेसाठी आज दादरमधील वाहतुकीत बदल; काही रस्ते बंद, जाणून घ्या, पर्यायी मार्ग कोणते?
महायुतीच्या सभेसाठी आज दादरमधील वाहतुकीत बदल; काही रस्ते बंद, जाणून घ्या, पर्यायी मार्ग कोणते?
Embed widget