एक्स्प्लोर

BJP Rebel Candidates: भाजपचा बंडखोरांना दणका! पक्षातून 40 जणांची हकालपट्टी! श्रीकांत भारतीयांच्या भावाचाही समावेश

BJP Rebel Candidates: भाजपमध्ये बंडखोरी केलेल्या चाळीस जणांवर पक्षाची ही कारवाई केली आहे. पक्षाने सांगूनही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने अखेर या नेत्यांची पक्षाकडून हाकालपट्टी करण्यात आली आहे.

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने बंडखोरी करणाऱ्या 40 जणांवर कडक कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षांने घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरी करणाऱ्यांमध्ये श्रीकांत भारतीय यांच्या भावाचा देखील समावेश असून, पक्षाच्या निर्णयामुळे चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपमध्ये बंडखोरी केलेल्या चाळीस जणांवर पक्षाची ही कारवाई केली आहे. पक्षाने सांगूनही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने अखेर या नेत्यांची पक्षाकडून हाकालपट्टी करण्यात आली आहे. 

विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार देताना पक्षाने काही ठिकाणी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. तर काही नव्या उमेदवारांची निवड केली होती. मात्र, काहींनी पक्षाच्या आदेशाचे पालन न करता उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला, त्यामुळे पक्षांच्या अडचणी वाढल्याने आता ही कारवाई करण्यात आली आहे. भाजपकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी बंडखोरांना स्थानिक पातळीवर जनतेचा आधार असू शकतो. त्यामुळे या 40 बंडखोरांची हकालपट्टी पक्षाच्या यशावर कितपत प्रभाव पाडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पक्षाच्या या निर्णयानंतर महायुतीतील प्रमुख नेते एकजुटीचे आवाहन करत आहेत.

भाजपकडून (महायुतीकडून) अधिकृत उमेदवार देऊन देखील पक्षातील नेत्यांनी बंडखोरी केल्यामुळे निवडणुकीच्या निकालांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी बंडखोरीमुळे मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या 40 बंडखोरांची हकालपट्टी केल्यानं आता चर्चा सुरू झाल्या आहेत. 

सावंतवाडी विशाल परब, श्रीगोंदा सुवर्णा पाचपुते, अक्कल कोट सुनील बंडगर, अमरावती जगदीश गुप्ता, साकोली सोमदत्त करंजकर, सोलापूर शहर उत्तर शोभा बनशेट्टी  यांच्यासह एकूण 40 जणांवर पक्षाची कारवाई करण्यात आली आहे. बडनेरा येथील तुषार भारतीय, नालासोपाराचे हरिश भगत, मागठाणे येथील गोपाल जव्हेरी, सावंतवाडीतील विशाल परब, श्रीगोंद्यातील सुवर्णा पाचपुते, अक्कलकोटमधील सुनील बंडगर, अमरावतीतील जगदीश गुप्ता आणि साकोलीतील सोमदत्त करंजकर यांच्यासह एकूण 40 जणांवर भाजपकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पक्षांतर्गत बंडखोरी कमी होण्याची शक्यता आहे.

कोणकोणत्या नेत्यांचा समावेश?

श्रीकांत करले

सोपान पाटील

मयुर कापसे

आश्विन सोनवणे

गजानन महाले

नागेश घोपे

तुषार भारतीय

जगदीश गुप्ता

प्रमोद सिंह गडरेल

सोमदत्त करंजेकर

शंकर मडावी

ब्रिजभूषण पाझारे

वसंत वरजुरकर

राजू गायकवाड

अतेशाम अली

भाविक भगत

नटवरलाल उंतवल

वैशाली मिलिंद देशमुख

मिलिंद उत्तमराव देशमुख

दिलीप वेंकटराव कंदकुर्ते

सुनील साहेबराव मोरे

संजय घोगरे

सतीश जगनाथराव घाटगे

अशोक पांगारकर

सुरेश सोनवणे

एकनाथ जाधव

कुणाल शिवाजी सुर्यवंशी

आकाश साळुंखे

जयश्री गरुड

हरिष भगत

स्नेहा देवेंद्र पाटील

वरुण सदाशिव पाटील

गोपाळ जव्हेरी

धर्मेंद्र गोपीनाथ ठाकूर

दिलीप विठ्ठल भोईर

बाळासाहेब मुरकुटे

शोभा बनशेट्टी

सुनिल बंडगर

सुवर्णा पाचपुते

विशाल प्रभाकर परब

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
Embed widget