Two Girls Drowned: बेळगावच्या सांबरा येथील धक्कादायक घटना, दोन सख्या बहिणींचा तलावात बडून मृत्यू
Two Girls Drowned: या घटनेमुळे गावावर शोककळा पसरलीय.
Two Girls Drowned: बेळगाव (Belgaum) येथील सांबरा (Sambra) येथून एक धक्कादायक माहिती समोर आली. दोन सख्ख्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. रविवारी दुपारी ही दुर्देवी घटना घडलीय. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली. मिळालेल्या माहितीनुसार, संध्या कोळवी (वय, 10) नेत्रा कोळवी (वय, 7) आणि प्रिया कोळवी (वय, 5) या तिघी सख्ख्या बहिणी रविवारी दुपारी देवपुजेचे साहित्य विसर्जन करण्यास जवळच्या तलावात गेल्या होत्या. मात्र, त्यावेळी नेत्रा आणि प्रिया दोघींचाही तलावात बुडून मृत्यू झालाय. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, नेत्रा आणि प्रिया पाण्यात बुडत असताना त्यांची मोठी बहिण संध्याने त्यांना हात धरून ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु, संध्याही पाण्यात बुडाली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने पाण्यात उडी टाकून संध्याला वाचवले. त्यानंतर परिसरातील तरूणांनी धाव घेत एका मुलीला बाहेर काढले. तिच्या पोटातील पाणी बाहेर काढून तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला. तर, दहा मिनिटांनी दुसऱ्या मुलीला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत या मुलीचा मृत्यू झाला होता. ग्राम पंचायत सदस्य भुजंग गिरमल आणि नागेश देसाई यांनी तलावात उडी मारून तिघींना बाहेर काढण्यास मदत केली.
कोळवी कुटुंबीय हे मूळचे गोकाक जवळील अंकलगी येथील असून मुलींचे वडील इराण्णा कोळवी हे भारतीय सैन्यदलात सेवा बजावत आहेत. काही दिवसापूर्वी इराण्णा हे सुट्टी संपवून कारवार येथे रुजू झाले होते. त्यांची पत्नी आणि मुली सांबरा येथे राहत होते. या घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरलीय.
हे देखील वाचा-