एक्स्प्लोर

Beed: बीड आगाराच्या गेटवर एसटी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Beed: हा प्रकार तात्काळ इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या कर्मचाऱ्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय.

Beed: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासांठी संप सुरु केला आहे. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या प्रमुख मागणीसाठी संप सुरु आहे. एसटीचे कर्मचारी 27 ऑक्टोबरपासून संपावर गेले आहेत. दरम्यान, आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने बीड बस आगाराच्या गेटवरच एका चालकानं विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. हा प्रकार तात्काळ इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या कर्मचाऱ्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय.

अमोल कोकटवाड असे विष प्राशन केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. कोकटवाड मूळचे परभणीचे आहे. ते बीड आगारात गेल्या दोन वर्षांपासून चालक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी तेही काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झाले. परंतु, मागण्या मान्य होत नसल्यानं त्यांनी विष प्राशन केल्याचं सांगण्यात येतंय. हा प्रकार इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांना  बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

हिंगोलीत वाहकाचं आत्महत्येचा प्रयत्न-

एसटी कर्मचाऱ्यांचा संप राज्यातील 59 पेक्षा अधिक आगारांमध्ये आंदोलन सुरु आहे. आंदोलनाकडे कुणीच लक्ष देत नसल्याने कळमनुरी आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. रमेश टाळीकुटे असं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. त्यांच्यावर हिंगोलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या-

- एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे.
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच 28 टक्के महागाई भत्ता दिवाळीपूर्वी मिळालाच पाहिजे.
- न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ठरलेल्या तारखेला वेतन देण्यात यावं.
- वाढीव घरभाडे 8, 16, 24 या दराने देण्यात यावं.
- वार्षिक वेतन वाढ 2 टक्क्यांऐवजी 3 टक्के देण्यात यावी.
- सर्व सणांना 12 हजार 500 रुपये उचल मिळावी.
- प्रलंबित वेतन वाढ देण्यात यावी. त्याचबरोबर कोरोना काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत देण्यात यावी, यासह ईतर मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

हे देखील वाचा- 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Result 2026: नागपूर पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस अन् भाजपमध्ये नेट टू नेट फाईट; कराळे मास्तर गेमचेंजर ठरणार?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: नागपूर पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस अन् भाजपमध्ये नेट टू नेट फाईट; कराळे मास्तर गेमचेंजर ठरणार?
ऊसाला पहिली उचल 4500 घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे, शेट्टींचा इशारा
ऊसाला पहिली उचल 4500 घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे, शेट्टींचा इशारा
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
Pradeep Purnekar : राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
Assembly Elections : अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
पुणे पदवीधर निवडणूक निकाल! हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? महत्वाची माहिती समोर 
पुणे पदवीधर निवडणूक निकाल! हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? महत्वाची माहिती समोर 
Embed widget