एक्स्प्लोर

राज्यभरात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज

मुंबईसह कोकणात सलग तीन दिवस पावसाचा जोर कायम असतानाच, येत्या 24 तासात तो आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबई : मुंबईसह कोकणात सलग तीन दिवस पावसाचा जोर कायम असतानाच, येत्या 24 तासात तो आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचसोबत मराठवाड्यालाही दिलासा मिळणार आहे, कारण येत्या 72 तासांत मराठवाड्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तिकडे विदर्भातही येत्या 48 तासात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने जोरदार धरला आहे. साताऱ्यातील कोयना आणि महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. तर कोल्हापुरातही मुसळधार पाऊस होत आहे. राधानगरीसह सहा धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. पावसाने कोकणाला झोडपलं मुसळधार पावसाने कोकणालाही झोडपून काढलं आहे. रत्नागिरीमध्ये चिपळुणच्या कापसाळ गावातील रस्त्यावर पाणी साचलं आहे. तर संगमेश्वरजवळच्या माखजण बाजारपेठेच्या सखल भागात पुराचं पाणी साचलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील व्यापाऱ्यांनी दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलवला. तर रायगड जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. पाली जवळच्या अंबा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. तसंच सावित्री नदीनेही धोक्याची पातळी ओलांडल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे मंगळवारी रात्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडीमध्ये अंकुर महिला केंद्रावर झाड कोसळलं होतं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. तर कुडाळ तालुक्यातील आंबेरीतील निर्मला नदीवर पूर आल्यामुळे बराच वेळ माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा संपर्क तुटला होता. अजूनही माणगाव खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे, तर दुसरीकडे बीएसएनएलची सेवा कोडमडली आहे. विदर्भातही दमदार पाऊस तिकडे विदर्भातही पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भाच्या 11 जिल्ह्यांपैकी 8 जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस बरसला आहे. गडचिरोलीत वैरागड येथील वैलोचना नदीचं पाणी पुलावरुन वाहू लागली आहे. दुसरीकडे गडचिरोली शहरात अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे. इतकंच नाही तर नगरपालिकेतही पाणी भरलं आहे. त्यामुळे 150 गावांचा संपर्क तुटला आहे. भामरागडमधील पर्लकोटा नदी दुथडी भरुन वाहत आहे. नागपुरातही अनेक ठिकाणी पाणी भरल्याचं चित्र दिसत आहे. मनीष नगर आणि बेलतरोडी भागात पाणी साचलं आहे. चंद्रपुरातील ब्रम्हपुरी, नागभीड आणि सिंदेवाही या तीन तालुक्यात पावसाने हजेरी लावली. मात्र इतर भागात पावसाची प्रतीक्षा कारवी लागणार आहे. गोव्यातील जनजीवन विस्कळीत गोव्यात काल सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. नद्या नाले दुथडी भरुन वाहत आहेत. राजधानी पणजीसह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीचीही कोंडी झाली. ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडल्याने नुकसान झालं आहे. एकंदरीत जोरदार पावसामुळे गोव्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. गुजरातला पावसाचा तडाखा गुजरातलाही जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे गुजरातमधील वलसाड आणि नवसारीमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्त्यांना नद्याचं रुप आलं आहे. तर घराघरात पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झालं आहे. मुसळधार पावसाचा परिणाम गुजरातमधील रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
MPSC Exam: MPSC परीक्षा घेत असलेल्या 'गट-क'च्या पदसंख्येत वाढ करा; भरती परीक्षा सुधारणांसाठी नेमलेल्या समितीची शिफारस
MPSC परीक्षा घेत असलेल्या 'गट-क'च्या पदसंख्येत वाढ करा; भरती परीक्षा सुधारणांसाठी नेमलेल्या समितीची शिफारस
Satej Patil On Gokul President Election 2026: गोकुळला अमूलच्या घशात घालण्याचा डाव, गद्दारी, बॅक डोअर एन्ट्री; सतेज पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे!
गोकुळला अमूलच्या घशात घालण्याचा डाव, गद्दारी, बॅक डोअर एन्ट्री; सतेज पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे!

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
Gold-Silver Today Rate: डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
Ravindra Chavan Meet Amit Shah : महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
Embed widget