एक्स्प्लोर

कोटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी 100 एसटी बस पाठवणार : अनिल परब

लॉकडाऊनमुळे राजस्थानच्या कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. हे विद्यार्थी लवकरच महाराष्ट्रात परतणार आहेत. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी एसटीच्या जवळपास 100 बस धुळ्यातून कोटा इथे जातील असं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.

मुंबई/धुळे : "राजस्थानमधील कोटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या जवळपास 100 बस धुळ्यातून जातील. पुढील दोन दिवसात या निर्णयाची अंमलबजावणी होईल," अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. सोमवारी (27 एप्रिल) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतल्याचं परब यांनी सांगितलं.

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील दीड ते दोन हजार विद्यार्थी राजस्थानच्या कोटामध्ये अडकले आहेत. महाराष्ट्र सरकारने आम्हाला परत आणण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ते सातत्याने करत होते. काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या विद्यार्थ्यांचा विचार करण्याची मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र आणि राज्यस्थान सरकारमध्ये याबाबत सकारात्मक चर्चा झाली आणि विद्यार्थ्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला. परंतु या विद्यार्थ्यांना कसं परत आणायचं असा प्रश्न होता. त्यावेळी महाराष्ट्राची लालपरी मदतीला धावून आली.

कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी एसटी धावणार 

100 एसटी धुळ्यातून कोटाला जाणार : अनिल परब "महाराष्ट्रातील जी मुलं कोटा इथे अडकली होती त्यांना परत आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याबाबत महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या जवळपास 100 बस धुळ्यातून कोटो इथे जातील आणि त्या मुलांना पुन्हा महाराष्ट्रात घेऊन येतील. त्यानंतर त्यांना आपापल्या जिल्ह्यात सोडण्याची व्यवस्था केली जाईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयाची अंमलबजावणी पुढील दोन दिवसात होईल," असं अनिल परब म्हणाले.

कोटामध्ये अडकलेले महाराष्ट्रीयन विद्यार्थी लवकरचं स्वगृही

एसटी नियोजन कसं करणार?

- राजस्थानमधील कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी एसटीनेही नियोजन केलं आहे. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी 100 बस धावणार आहेत.

- लांबचा प्रवास असल्याने एका चालकावर ताण येऊ नये यासाठी एका बससाठी दोन चालक राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

- बस मध्यप्रदेश मार्गे कोटाकडे रवाना होणार आहेत.

- कोरोनाचा संसर्ग होऊ नये किंवा टाळता यावा, यासाठी खबरदारी म्हणून एका एसटी बसमध्ये 20 विद्यार्थी बसवले जातील अशी शक्यता आहे.

- कोटा इथून या विद्यार्थ्यांना आणताना आरोग्यविषयक सुरक्षेचे, सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन होणार आहे, असं एसटीच्या सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान या कामासाठी काही विभागातील चालकांना या स्पेशल ड्युटीसाठी बोलावण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबाने मात्र चिंता व्यक्त केली आहे.

Lockdown | दिल्लीत अडकलेल्या महाराष्ट्रातील यूपीएससी विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहोत : सत्यजीत तांबे

हजारो विद्यार्थी कोटामध्ये अडकले? विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी राजस्थानमधील कोटा इथे जातात. महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश असतो. यावर्षी कोटामध्ये शिकायला गेलेल्या हजारो विद्यार्थ्यांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे. पहिला लॉकडाऊन 14 एप्रिलला संपणार होता. त्यावेळीस या विद्यार्थ्यांना 14 एप्रिलपर्यंत इथेच राहा, मग पुढे पाहू, असं तिथल्या शिक्षणसंस्थांनी सांगितलं होतं. यानुसार हे विद्यार्थी तिथेच थांबले. मात्र येत्या 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवल्याने अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात परत येण्यासाठी विनंती केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीचा राज्य सरकारने सकारात्मक विचार करत त्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. यासाठी लवकरच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस कोट्याला रवाना होणार असून तिथे अडकलेल्या सर्व विद्यार्थ्याना महाराष्ट्रात लवकरच आणलं जाईल.

Kota Students | कोटात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी 100 एसटी बसेस पाठवणार : अनिल परब

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Shivsena UBT: आधी सरनाईकांचा खळबळजनक दावा, मग कळंबचे नगरसेवक तानाजी सावंतांच्या भेटीला, उद्धव ठाकरेंनी कैलास पाटलांसह धाराशिवच्या सर्वांना मातोश्रीवर बोलावलं
आधी सरनाईकांचा खळबळजनक दावा, मग कळंबचे नगरसेवक तानाजी सावंतांच्या भेटीला, उद्धव ठाकरेंनी कैलास पाटलांसह धाराशिवच्या सर्वांना मातोश्रीवर बोलावलं
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget