एक्स्प्लोर

TET Exam Scam : TET परीक्षा घोटाळ्यात दिल्ली कनेक्शन; दोन जणांना सायबर पोलिसांकडून अटक

TET Exam Scam : TET परीक्षा घोटाळ्यात दिल्ली कनेक्शन उघड झालं आहे. TET परीक्षा घोटाळ्यात आणखीन दोन जणांना सायबर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

TET Exam Scam : TET परीक्षा घोटाळ्यात दिल्ली कनेक्शन उघड झालं आहे. TET परीक्षा घोटाळ्यात आणखीन दोन जणांना सायबर पोलिसांनी अटक केली असून दिल्ली येथून आशुतोष शर्मा आणि रोहिणी अवंतिका यांना अटक केली आहे. अटकेत असलेल्या निशीद गायकवाड यांच्या तपासातून आशुतोष शर्मा आणि सहकार्याने पेपर पुरविल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार पुणे पोलिसांचं पथक गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून होतं. शर्मा आणि अवंतिका यांच्या तपासातून साखळीतील आरोपीचा पोलीस शोध घेणार आहेत. 

टीईटी घोटाळ्याचा असा झाला खुलासा 

  • 30 नोव्हेंबरला एबीपी माझाने आरोग्य भरती गट ड चा पेपर फुटल्याच वृत्त दिलं. त्यासाठी सैन्याच्या गुप्तचर विभागांकडून अटक करण्यात आलेल्या हवालदार अनिल चव्हाणचे एका एजंटसोबत मोबाईलवरून झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप पुरावा म्हणून समोर ठेवली.  
  • तोपर्यंत पेपर फुटलाच नाही असा दावा करणाऱ्या पोलीसांना या प्रकरणाचा तपास सुरु करणं भाग पडलं. 
  • पिंपरी-चिंचवड पोलीसांनी तपास न केल्याने पुणे सायबर पोलीसांनी या प्रकरणात तपास सुरु केला आणि विजय मुराडेला या प्रकरणात औरंगाबादमधून एक डिसेंबरला अटक केली. या विजय मुराडेकडे आरोग्य विभागाचा पेपर टेलिग्रामवर आला होता. 
  • त्यानंतर या प्रकरणातील अटक सत्राने वेग घेतला आणि पेपर फुटीत सहभागी असलेले एजंट्स आणि अॅकडमी चालवणाऱ्या अनेकांना अटक करण्यात आली. 
  • परंतु या प्रकरणात महत्वाचा टप्पा तेव्हा आला जेव्हा पुणे सायबर पोलीसांनी लातुरच्या आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगीरेला सात डिसेंबरला अटक केली. 
  • बडगिरेच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. मात्र त्यानंतर पुणे पोलीसांनी आठ डिसेंबरला आरोग्य विभागातील सहसंचालक डॉक्टर महेश बोटलेला अटक केली.  ही आतापर्यंतची या प्रकरणातील सर्वात मोठी अटक होती.
  • या प्रकरणात चौकशी सुरु असतानाच ही पुणे पोलिसांना म्हाडाचा पेपर ही फुटणार असल्याच पोलीसांना समजलं. 
  • बारा डिसेंबरला होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षेच्या आदल्या रात्री म्हणजे अकरा डिसेंबरला पुणे पोलिसांनी ही परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या जी ए टेक्नॉलॉजीज कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुखला ताब्यात घेतलं. 
  • प्रितेश देशमुखच्या चौकशीतून आणखी धक्कादायक खुलासे होण्यास सुरुवात झाली. 
  • प्रितेश देशमुखच्या घरातून पुणे पोलीसांना तपास करताना टी ई टी परिक्षेशी संबंधित डाटा पेन ड्राइव्हमध्ये सापडला.  त्याचबरोबर टीईटी परिक्षेतील उमेदवारांची ओळखपत्रंही मिळाली. 
  • आता पुणे पोलीसांनी त्यांचा तपास टी टी परीक्षेवर केंद्रीत केला. 
  • या तपासात प्रितेश देशमुख सोबत महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपे सहभागी असल्याच पुणे पोलीसांना समजलं.
  • पुणे पोलीसांनी 16 डिसेंबरला तुकाराम सुपेकडे चौकशी सुरु केली.
  • तुकाराम सुपेच्या घरातून पोलीसांना एकोणव्ववद रुपयांची रोकड सापडली. आणि 17 डिसेंबरला पोलीसांनी तुकाराम सुपेला अटक केली.

टीईटी परीक्षा घोटाळा 

आरोग्य भरतीच्या पेपर परीक्षेपासून सुरु झालेलं पेपर फुटीचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाही . कारण म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जी .ए . टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुख याच्या पिंपरी-चिंचवडमधील घरातून पुणे सायबर पोलिसांना शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या टी ई टी परीक्षेची कागदपत्रं सापडली आहेत. जी ए टेक्नॉलॉजी या कंपनीकडे जबाबदारी असलेल्या टीईटी अर्थात शिक्षक भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे पुणे सायबर पोलीसांच्या तपासात उघड झाले आहे.  21 नोव्हेंबरला ही परीक्षा झाली होती. आरोग्य भरती आणि म्हाडा पाठोपाठ शिक्षक भरतीच्या पेपरमधेही गैरव्यवहार झाल्याचे तपासात आतापर्यंत निष्पन्न झाले आहे.

जी. ए.  टेक्नॉलॉजीकडे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वीस पोलीस भरती प्रक्रियेचीही जबाबदारी होती.  त्याचबरोबर प्रितेश देशमुख प्रमुख असलेल्या जी . ए .टेक्नॉलॉजी कंपनीकडे महाराष्ट्रातील तब्ब्ल वीस जिल्ह्यांच्या पोलीस भरतीची जबाबदारी देण्यात आली होती . त्यामुळं या कंपनीकडून राबवण्यात आलेल्या सगळ्याच भरती प्रक्रियांबद्दल संशय  निर्माण झालंय . पेपर फुटीचा तपास करणाऱ्या तपास यंत्रणांना एका प्रकरणाचा तपास करता करता आणखी एका परीक्षेचा देखील पेपर फुटल्याचं समजलं. त्या दुसऱ्या प्रकरणाचा तपास सुरु केला की, आणखी एका तिसऱ्या परीक्षेचाही पेपर फुटल्याचं ध्यानात येत आहे. पेपर फुटीचं हे चक्र प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना चक्रावून सोडणारं ठरतंय.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलेय; रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचा विचार अन् रामदास आठवलेंचा डेडली स्ट्राईक, म्हणाले, 'राज ठाकरेंची हवा निघून गेलीय'
Jalgaon Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या प्रेयसीचे धाडसी कृत्य; प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या प्रेयसीचे धाडसी कृत्य; प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : 08 December 2024 : Superfast News : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 08 December 2024Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 8 डिसेंबर 2024  : ABP MajhaNana Patole Full PC : आम्ही विधानसभेतील आणि रस्त्यावरीलही लढाई लढू - पटोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलेय; रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचा विचार अन् रामदास आठवलेंचा डेडली स्ट्राईक, म्हणाले, 'राज ठाकरेंची हवा निघून गेलीय'
Jalgaon Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या प्रेयसीचे धाडसी कृत्य; प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या प्रेयसीचे धाडसी कृत्य; प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
Saffron Farming Success: रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
जानकरांनी राजीनामा द्यावा, मी कशावरही निवडणूक लढायला तयार, राम सातपुतेंचं आव्हान, म्हणाले पवारांच्या सभेला पडळकरांच्या सभेनं चोख उत्तर देणार 
जानकरांनी राजीनामा द्यावा, मी कशावरही निवडणूक लढायला तयार, राम सातपुतेंचं आव्हान, म्हणाले पवारांच्या सभेला पडळकरांच्या सभेनं चोख उत्तर देणार 
Ind vs Aus 2nd Test : रात गयी, बात गई! सिराज- हेडच्या वादाबाबत विचारताच रोहित शर्मातील मुंबईकर जागा झाला, म्हणाला...
रात गयी, बात गई! सिराज- हेडच्या वादाबाबत विचारताच रोहित शर्मातील मुंबईकर जागा झाला, म्हणाला...
Embed widget