(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra SSC Result 2021 : आज दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार
आज दुपारी 1 वाजता दहावीची निकाल जाहीर केला जाणार आहे. निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे.
SSC Result 2021 : आज दहावीचा निकाल ( SSC Result 2021) जाहीर होणार आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा लागणार आहे. आज दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. यंदाच्या निकालाचं विशेष महत्त्व म्हणजे, इतिहासात पहिल्यांदाच दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती दिली. राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्याचा शासन निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकष सुद्धा ठरवले होते. या मूल्यमापनाच्या आधारे आज दहावीचा निकाल दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे. बोर्डाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेसस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबत माहिती दिली. यावर्षी पहिल्यांदाच दहावी बोर्ड परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे हा निकाल पूर्णपणे अंतर्गत मूल्यपामनद्वारे तयार करण्यात आला आहे.
www.mahahsscboard.in (या संकेतस्थळावर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतील)
दहावीची परीक्षा यावर्षी 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र त्याच दरम्यान राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहता ही परीक्षा रद्द करण्यात आली. विद्यार्थ्यांना इयत्ता नववी आणि दहावीच्या मिळवलेल्या गुणांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्याच्या सूचना करण्यात आल्या. यामध्ये इयत्ता नववी मिळालेले 50 टक्के गुण व दहावीत वर्षभरात अंतर्गत मूल्यमापनाचे 50 टक्के गुण एकत्र करून हा निकाल तयार करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले होते. त्यानुसार शाळांनी मुख्यध्यापकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करून विषयनिहाय गुण विद्यार्थ्यांना देऊन हा निकाल बोर्डाकडे पाठवला. त्यानंतर बोर्डाकडून या शाळेकडून आलेल्या निकालावर योग्य ते काम करून उद्या हा निकाल जाहीर करण्याचे ठरवले आहे. दहावीच्या निकलाबाबत विद्यार्थी समाधानी नसल्यास त्यांना परिक्षेचा देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. यावर्षी दहावीच्या परिक्षेसाठी एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 9 लाख 9 हजार 931 मुले तर 7 लाख 48 हजार 693 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आता या परीक्षेचा उद्या निकाल लागणार आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
SSC Result : अंतर्गत मूल्यमापनद्वारे तयार करण्यात आलेल्या निकालाबाबत शिक्षकांचं म्हणणं काय?