काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही
kashmiri pandit : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी आपण काश्मिरी पंडितांच्या मागे ठाम उभा असल्याचे म्हटले आहे. याबरोबरच उद्धव ठाकरे यांनी काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली.

मुंबई : जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितांना (kashmiri pandit) लक्ष्य केले जात आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप होत असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी आपण काश्मिरी पंडितांच्या मागे ठाम उभा असल्याचे म्हटले आहे. "काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करेन, अशी ग्वाही देत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून काश्मिरी पंडित आणि हिंदूंचे टार्गेट किलिंग' कश्मीर खोऱ्यात सुरू आहे. महिनाभरात जपळपास नऊ काश्मिरी पंडितांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. शेकडो भयभीत काश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे. अवघ्या देशात याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खोऱ्यातील या परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. शिवाय महाराष्ट्र काश्मीरी पंडितांच्या मागे ठाण पणे उभा असल्याचे म्हटले आहे.
"काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांचे अक्षरक्ष: शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीची स्वप्ने दाखविली गेली. पण घरवापसी तर दूरच उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारले जात आहे. या भयानक परिस्थितीत पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झाले, ही धक्कादायक तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे. याक्षणी शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी इतकंच वचन देऊ शकतो की, या कठीण काळात काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, " 19950 साली महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार आले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मिरी पंडितांच्या मुलांना महाराष्ट्रात विशेष बाब म्हणून शिक्षणात आरक्षण दिले होते. तसेच शिवसेनाप्रमुखांनी सातत्याने काश्मिरी पंडितांच्या रक्षणासाठी आवाज बुलंद केला. महाराष्ट्राने काश्मिरी पंडितांसोबत कायमच संवेदनशील नाते जपले आहे. हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो आणि कर्तव्य भावनेनेच त्याकडे पाहतो. सध्या खोऱ्यातील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. काश्मिरी पंडितांच्या नेत्यांशीही चर्चा सुरू आहे. काश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व करू. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, महाराष्ट्र आपले कर्तव्य बजावेल."
Before You Go
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
महत्त्वाच्या बातम्या






















