Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे माझं ऐकतील मला विश्वास : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह स्थापन केलेली महाविकास आघाडी कायम राहणार असल्याचे सूतोवाच उद्धव ठाकरेंनी या बैठकीत केले आहे.
मुंबई : पक्षाविरोधात बंड पुकारलेल्या शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना एका बाजूने कडक संदेश आणि दुसऱ्या बाजूने मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत.तर एकनाथ शिंदेवर माझं ऐकतील आणि परत येतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना आमदार- खासदारांची आज एक बैठक पार पाडली त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, आपण ज्यावेळी भाजपसोबत सत्तेत होतो. त्यावेळी आपल्याला काय कमी त्रास झाला आहे का? मग आता परत भाजपसोबत कशाला जायचं? सध्या आपण महाविकासआघाडी सोबत आहोत. दोन्ही पक्ष आपल्या सोबत आहेत. त्यामुळे कुठेही घाबरण्याचे कारण नाही. एकनाथ शिंदे यांना समजवण्याचा प्रयत्न सुरू आहे ते माझे ऐकतील त्यामुळे कोणीही चिंता करू नये.
मिलिंद नार्वेकर आणि संदीप फाटक यांची एकनाथ शिंदे यांची भेट झाली. उभय नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी शिंदे यांनी महाविकास आघाडीमध्ये राहू नये, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, तुमचं काही नाही,माझं काही नाही तर जायचं कशाला?
उद्धव ठाकरे आज संध्याकाळी पुन्हा एकदा शिवसेना आमदारांची आणि नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदार - खासदारांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ शिंदेशी सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती दिली. भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव दिला असला तरी त्यावर तुर्तस कोणतीही चर्चा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह स्थापन केलेली महाविकास आघाडी कायम राहणार असल्याचे सूतोवाच उद्धव ठाकरेंनी या बैठकीत केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे गुजरातमध्ये....राजकीय भूकंप महाराष्ट्रात; शिंदेंचे बंड, शिवसेनेची बैठक...काय घडलं दिवसभरात?
- Eknath shinde : मला मंत्री केलं नाही तरी चालेल पण भाजपसोबत सत्ता स्थापन करा... एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
- Devendra Fadanvis : ते पुन्हा येणार?... या पाच कारणांमुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता