एक्स्प्लोर

Aaditya Thackeray : वेदांता नेलं, वर्ल्डकपची मॅच नेली, 40 गद्दार पळवले, आता हिरे व्यापारांवरुन आदित्य ठाकरेंचं शिंदे सरकारवर टीकास्त्र

Aaditya Thackeray : महाराष्ट्रातून हिरे व्यापार गुजरातला स्थलांतरित करण्यात येत आहे. यावरुन ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या सरकारला गुजरातची जास्त काळजी आहे असं म्हणत हल्लाबोल केलाय.

मुंबई : सध्या महाराष्ट्रातले अनेक महत्त्वाचे प्रकल्प हे गुजरातला (Gujarat) हलवले जातायत. यामुळे विरोधी पक्षाकडून सरकारला चांगलंच धारेवर धरलं जातय. आता महाराष्ट्रातील (Maharashtra) हिरे व्यापार देखील गुजरातला स्थलांतरित करण्यात येणार आहे. यावर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राचं महत्व कमी करण्यासाठी काय काय खेचत आहेत गुजरातला असा सवाल आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्वीटच्या माध्यमातून उपस्थित केला. तर या सरकारला मुंबई आणि महाराष्ट्रपेक्षा गुजरातची जास्त काळजी असल्याचं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय. 

याआधी वेंदात वेदांता फॉक्सकॉन, एयरबस टाटा, विश्वचषकाचा अंतिम सामना यांसारखे अनेक मोठे प्रकल्प आणि कार्यक्रम गुजरातला स्थलांतरित करण्यात आले. त्यावरुन राज्याचं राजकारण देखील चांगलंच तापलं. 

आदित्य ठाकरेंनी ट्वीटमध्ये काय म्हटलं?

'वेदांता फॉक्सकॉन, एयरबस टाटा, बल्क ड्रग्स पार्क, 40 गद्दार, क्रिकेट वर्ल्ड कप फायनल... आणि आता डायमंड बोर्स... विचार करा !महाराष्ट्राचं महत्व कमी करण्यासाठी काय काय खेचत आहेत गुजरातला! आणि हे सगळं बुलेट ट्रेन सुरु होण्याआधी. ह्या मिंधे-भाजपा चं ध्येय आहे की महाराष्ट्र सरकार पण गुजरात मधूनच चालवायचं आणि मुंबई पण!' 'ह्या महाराष्ट्र द्वेष्ट्या मिंधे-भाजपाला आपण साथ देणार का?' असा सवाल विचारत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. 

या सरकारला गुजरातची जास्त काळजी - आदित्य ठाकरे

या सरकारला मुंबई आणि महाराष्ट्रपेक्षा गुजरात दिल्लीची जास्त काळजी असल्याचं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, 'तोडून मोडून हे सरकार बनलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रसाठी हे सरकार काही करेल असं आम्हाला वाटत नाही. हे सगळं कोणाच्या सांगण्यावरुन केलं जातय हे आम्हाला माहित आहे. बुलेट ट्रेन काम पूर्ण झाल्यानंतर या सरकारला मंत्रालय सुद्धा गुजरातला हलवाव असं वाटेल.' 

डायमंड बोर्स व्यापार केंद्राची निर्मिती 

सुरतमध्ये मागील अनेक वर्षांपासून हिऱ्यांची निर्मिती केली जाते. पण सुरतमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ नसल्यामुळे हा व्यापार मुंबईतून केला जात होता. हिऱ्यांची निर्मिती जरी सुरतमध्ये होत असली तरी त्याचा मुख्य व्यापार हा मुंबईतून होत होता. पण आता सुरतमध्ये डायमंड बोर्स नावाचं मोठं व्यापाराचं केंद्र सुरु करण्यात आलंय. त्यामुळे मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांचा कल आता सुरतकडे चाललाय. 

हेही वाचा : 

Uddhav Thackeray : PM मोदींची पवारांवरील टीका उद्धव ठाकरेंनी ढाल बनून परतवली, म्हणाले अजितदादांच्या 70 हजार कोटीबद्दल बोला!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : बाळासाहेबांच्या मनातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचे प्रयत्नSanjay Raut on Shivsena Advertisenment : शिंदेंच्या शिवसेनेची जाहीरात; राऊतांचा पलटवारSharad Pawar Bag Checking Baramati : बारामतीत शरद पवारांच्या बॅगची तपासणीNagpur Congress :भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी काढले प्रियंका गांधींचे होर्डींग्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी विमानतळावर दिसताच ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'
शरद पवारांनी सांगितलं, आता पुढच्याला संधी द्या; अजितदादा म्हणाले, बाकीच्यांनी गोट्या खेळायच्या का?
Embed widget