एक्स्प्लोर

'कुणालाही मारहाण, जबरदस्ती नाही'; एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांकडून संजय राऊतांच्या आरोपाचं खंडन 

संजय राऊत यांनी शिवसेना आमदारांना सूरतमध्ये मारहाण झाल्याचा आरोप केला होता. मात्र राऊत यांचा हा आरोप स्वत: एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांनी फेटाळून लावला आहे. 

Maharashtra Shiv Sena MLA Latest Updates : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकल्यानंतर खळबळ उडाली आहे. अशात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आमदारांना सूरतमध्ये मारहाण झाल्याचा आरोप केला होता. मात्र राऊत यांचा हा आरोप स्वत: एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांनी फेटाळून लावला आहे. 

संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, सगळेजण आनंदात आहेत, कुणालाही मारहाण, जबरदस्ती करण्यात आलेली नाही. आमदारांच्या मनात अनेक वर्षांपासून खदखद आहे, असं शिंदे यांनी म्हटलं.

आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलं की, आम्ही सर्वजण सोबत आहोत. आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर नाराजी आहे, असं ते म्हणाले. हे सर्व आमदार आहेत. त्यांना मारुन मुकटून कसं ठेवतील. आमदार छोटा माणूस नसतो की त्याला मारुन बसवू शकू. आम्ही आमच्या मर्जीनं आणि एकदिलानं इथं आहोतं. आमदार नितीन देशमुख यांची तब्येत व्यवस्थित आहे, असंही शिरसाट यांनी सांगितलं.

संजय राऊतांनी काय म्हटलं होतं...

संजय राऊत यांनी शिवसेनेच्या काही आमदारांना मारहाण झाल्याचा आरोप केला होता. तसेच सामनाच्या अग्रलेखातही यावर भाष्य करण्यात आलं होतं. त्यात म्हटलं होतं की, शिवसेनेच्या दहाएक आमदारांना 'उचलून' गुजरातला नेण्यात आले. त्यांच्या भोवती कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. यातील दोन-चार आमदारांनी या गराड्यातून सुटण्याचा व पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना शारीरिक इजा होईपर्यंत मारहाण करण्यात आली. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांना तर इतकी मारहाण झाली की त्यांना हृदयविकाराचा झटका आला व इस्पितळात दाखल करावे लागले. कैलास पाटील हे आमदार घेराबंदीतून सटकले आणि भर पावसात चालत रस्त्यावर येऊन कसेबसे मुंबईस पोहोचले. अशाप्रकारे चार-पाच आमदारांनी सुटकेचा प्रयत्न केला तेव्हा गुजरात पोलिसांनी त्यांना अटक करून 'ऑपरेशन कमळ'वाल्यांच्या ताब्यात दिले, असा आरोप करण्यात आला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या

शिंदेंसोबत शिवसेनेचे नेमके आमदार किती? शिंदे म्हणतात 40 तर कुणी म्हणतंय 33, कुणी म्हणतंय 35... 

महाराष्ट्रावर वार! एकनाथ शिंदेंच्या मानगुटीवर बसून भाजप 'ऑपरेशन कमळ' घडवतंय; सामनातून हल्लाबोल 

महाराष्ट्रातील राजकीय भूकंपामागे गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा मोठा हात; कोण आहेत CR पाटील?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?

व्हिडीओ

Mahapalika Mahasangram Akola : अकोल्यात पालिका निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार?
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalika Mahasangram Jalna : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर स्थानिकांचं मत काय? जालनाकर काय म्हणाले?
Manda Mhatre On Ganesh Naik आणि माझ्यातील शीतयुद्ध संपले, दोघे मिळून नवी मुंबईवर भगवा फडकवणार
Thackeray Brother Alliance : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा ठाकरे बंधू एकत्र घेणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
Embed widget