एक्स्प्लोर
पटपडताळणीसाठी सेल्फीच्या निर्णयाला शिक्षक परिषदेचा विरोध
मुंबई : पटपडताळणीसाठी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र शिक्षक संघटेनने विरोध केला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र शिक्षक परिषद ही संघाची शाखा आहे.त्यामुळे शिक्षण खात्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
सेल्फीच्या निर्णयामुळे शिक्षणाची गुणवत्ता सुधारणार नसून उलट यामुळे शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त भार पडेल, असा दावा शिक्षक संघटेनेने केला आहे.
येत्या जानेवारीपासून प्रत्येक सोमवारी शिक्षकांना विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. सेल्फीच्या मोहाने गैरहजर असणारे 18 टक्के विध्यार्थी शाळेकडे आकर्षित होतील, या आशेने शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.
दर सोमवारी शाळेचा पहिला तास सेल्फीचा!
हजेरीसाठी कशी आहे सेल्फीची प्रक्रिया? देशातली 18 टक्के मुले पटावर नोंद असूनही प्रत्यक्षात शाळेत येत नाहीत. त्यामुळे हजेरीची सातत्याने पडताळणी करण्यासाठी आधी बायोमेट्रिकचा पर्याय स्वीकारण्यात आला. पण आता त्यापेक्षा सेल्फीचा पर्याय सोपा असल्याने त्याच्या अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. शिक्षकांनी सोमवारच्या सकाळी प्रत्येकी 10 विद्यार्थ्यांचा गट तयार करुन सेल्फी काढून शासनाच्या ‘सरल’ या प्रणालीवर अपलोड करावा लागणार आहे. इतकंच नाही, तर अनियमित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव, त्यांचा आधारक्रमांक आणि त्यांच्यासोबतचा सेल्फीही शिक्षकांना ‘सरल’वर अपलोड करावे लागणार आहे. मात्र सोमवारच्या पहिल्या तासानंतर उर्वरित पाच दिवसाच्या पट संख्येचा प्रश्न सरकार कसा सोडवणार हा प्रश्न अनुत्तरित आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement