एक्स्प्लोर

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण: खटला अन्य न्यायाधीशांकडे वर्ग करण्यास राज्य सरकारचा विरोध

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू असलेला खटला अन्य न्यायाधीशांकडे वर्ग करण्यास राज्य सरकारनं विरोध केला आहे. तसेच हा अर्ज मोठा आर्थिक दंड आकारून फेटाळून लावावा, जेणेकरून अशा पद्धतीनं कोर्टाच्या कामकाजावर सवाल उठवणाऱ्यांना योग्य तो धडा मिळेल.

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील 25 हजार कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू असलेला खटला अन्य न्यायाधीशांकडे वर्ग करण्यास राज्य सरकारनं विरोध केला आहे. तसेच हा अर्ज मोठा आर्थिक दंड आकारून फेटाळून लावावा, जेणेकरून अशा पद्धतीनं कोर्टाच्या कामकाजावर सवाल उठवणाऱ्यांना योग्य तो धडा मिळेल. याचिकाकर्त्यांनी केलेल्या अर्जातील आरोप हे वस्तुस्थितीला अनुसरून नसल्यानं ते पूर्णत: चुकीचे आहेत. या खटल्यातील मूळ तक्रारदार आणि याचिकाकर्ता सुरेंद्र मोहन अरोरा यांनी आपला लेखी युक्तिवाद याच कोर्टात सादर केला आहे. त्यामुळे या अर्जामागे इतर याचिकाकर्त्यांचा कोणताही हेतू सिद्ध होत नाही. असंही तपासयंत्रणेच्यावतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 4 मे रोजी होणार आहे.

या खटल्यातील न्यायाधिशांच्या कार्यपध्दीवर आक्षेप घेत, हा खटला अन्य न्यायाधिशांकडे वर्ग करा, अशी विनंती करणारा अर्ज तक्ररदारांनी कोर्टात दाखल केला आहे. मूळ तक्रारदार सुरिंदर अरोरा यांच्या सह माजी मुख्यमंत्री कै.वसंतदादा पाटील यांच्या पत्नी सुशालीनीताई पाटील, निलंग्याचे माजी आमदार माणिकराव जाधव, पारनेर साखर कारण्याचे संचालक यांच्यासह जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावतीनं दाखल केलेल्या या अर्जाची मुंबई सत्र न्यायालयाचे प्रभारी प्रधान न्यायाधीश ए.टी.वानखडे यांनी गंभीर दखल घेत तपासयंत्रणेला उत्तर देण्याचे निर्देश दिले होते.

हा खटला गेली दोन वर्षे मुंबई सत्र न्यायालयातील ईओडब्ल्यू कोर्टाचे न्यायाधीश ए.सी. दागा यांच्या समोर सुरू आहे. मात्र गेल्या दोन वर्षात त्यात काहीहीप्रगती झाली नाही. तसेच गुन्हे अन्वेशन विभागाला सतत त्यांच्या सोयीची वागणूक मिळत आहे. असा आरोप न्यायाधिशांच्या कार्यपध्दतीवर करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर ही पोलीसंनी 31 मार्चला न्यालयात सादर केलेल्या कागदत्रात महत्वाची सुमारे 75 हजार कागदपत्र जमाच केलेली नाहीत. त्या संदर्भात लेखी आक्षेपही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुळ तक्रारीलाच हरताळ फासला जात असल्याने या न्यायाधिशांकडून आम्हाला योग्य न्याय मिळण्याची शक्यता नसल्यानं हा खटला अन्य न्यायाधिशांकडे वर्ग करावा अशी विनंती तक्रारदारांनी केली आहे. 

काय आहे प्रकरण -

महाराष्ट्र राज्य सहकारी  बँकेच्या  संचालक मंडळ आणि अध्यक्षांनी सूत गिरणी आणि साखर कारखान्यांसाठी कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले. परंतु या कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेचे प्रचंड नुकसान होऊन बँक अवसायानात गेली. यात सुमोर 25 हजार कोटींचा घोटाळा झाला. ज्याला तत्कालीन संचालक मंडळ जबाबादार आहे,असा आरोप करून या प्रकराची चौकशी करावी अशी विनंती करणारी याचिका सुरींदर अरोरा यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. याची दखल घेत हायकोर्टानं  नाबार्ड तसेच मुंबई पोलिसांचा अहवाल पाहता प्रथम दर्शनी गुन्हा दाखल होऊन चौकशी होणं गरजेचं आहे. असे आदेश ऑगस्ट 2019 मध्ये दिले होते. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) या प्रकरणी गुन्हा दाखल केला. मात्र तपासाअंती कोणताही दखलपात्र गुन्हा घडला नसल्याचा निष्कर्ष नोंदवणारा सी समरी अहवाल पोलिसांनी सप्टेंबर 2020 मध्ये न्यायालयात सादर केला आणि प्रकरण बंद करण्याची विनंती केली. मुंबई पोलिसांच्या या 'सी समरी' अहवाला सुरिंदर मोहन अरोरा यांच्यासह अन्य याचिकाकर्त्यांनी विरोध करत याचिका दाखल केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Chandrashekhar Bawankule on Manoj Jarange Patil: बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यास सांगितले, त्यांची नार्को टेस्ट करा; मनोज जरांगेंच्या आरोपावर महसूल मंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यास सांगितले, त्यांची नार्को टेस्ट करा; मनोज जरांगेंच्या आरोपावर महसूल मंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Embed widget