एक्स्प्लोर

Maharashtra School Reopening LIVE Updates : शाळांमध्ये पुन्हा एकदा किलबिलाट! कुठे शाळा सुरु, कुठे बंद? पालकांच्या भूमिकेकडे लक्ष

Maharashtra School Reopening LIVE Updates : ओमायक्रॉनमुळं बंद झालेल्या शाळा आजपासून सुरु होणार, पालकांच्या भूमिकेकडे लक्ष, तर 14 जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू न करण्याचा स्थानिक प्रशासनाचा निर्णय

LIVE

Key Events
Maharashtra School Reopening LIVE Updates : शाळांमध्ये पुन्हा एकदा किलबिलाट! कुठे शाळा सुरु, कुठे बंद? पालकांच्या भूमिकेकडे लक्ष

Background

Maharashtra School Reopening LIVE Updates : राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. कोरोना महामारीच्या काळात तब्बल सातशे दिवस शाळा बंद होत्या. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका कमी झाला आहे अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. परंतु, शाळा सुरू होत असल्या तरी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटतं त्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे. ज्यांना वाटते रिस्क घेऊ नये त्यांनी घेऊ नये. उद्यापासून शाळा सुरू होत असल्या तरी पुढची पावलं कशी टाकयची हे शाळा आणि पालकांनी ठरवायचे आहे, असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटतं त्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. 

शाळा सुरु करण्याचा निर्णय जिल्हा आणि स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आला आहे. मात्र, अनेक जिल्हा प्रशासन वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं दिसतंय. मुंबई महापालिकेने स्थानिक स्तरावर पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा 24 जानेवारीपासून  सुरू करण्यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आहे. पुण्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय आणखी आठवडाभर पुढे ढकलण्यात आला आहे. तर, नागपुरात 26 जानेवारीनंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. नाशिकमध्ये मात्र सोमवारपासून शाळा सुरु करण्यात येणार आहेत. नाशिकमधील पहिली ते बारावीच्या शाळा सोमवारपासून सुरु होणार आहेत. तर शाळेत विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यास पुन्हा शाळा बंद करण्यात येईल. अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलीय. यवतमाळ जिल्ह्यातील शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. नववी वी ते 12 वी पर्यंतचे सर्व वर्ग होणार सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलीय.

धुळे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात फक्त इयत्ता नववी ते 12 च्या 420 शाळा सुरू होणार आहे. नववी ते 12 च्या शाळांना मिळणारा प्रतिसाद पाहून पहिल्या आठवड्यानंतर उर्वरित शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभाग घेणार आहे. शाळेचे कामकाज फक्त तीन तास चालणार असून  प्रत्येक शाळेत वैद्यकीय कक्ष बंधनकारक करण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यात सोमवारपासून शहरी भागातील आठवी ते 12 वीपर्यंत तर ग्रामीण भागातील पहिली ते 12 वी पर्यतचे वर्ग उघडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. नंदुरबार जिल्ह्यात शाळा 24 जानेवारीपासून पहिली ते 12वी पर्यंत शाळा सुरू होणार आहेत.

वाशिम, अमरावतीत जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालय बंद राहणार आहेत. कोरोना संसर्ग वाढत असल्याने वाशिमचे जिल्हाधिकारी षण्मुग राजन एस यांनी हा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात येणार आहेत. औरंगाबाद, बीड, नांदेडमध्ये फक्त दहावी, बारावीच्या शाळा सुरु होणार आहेत.
14:01 PM (IST)  •  24 Jan 2022

शाळेत शिक्षक किंवा विद्यार्थी पॉझिटिव्ह निघाला तरी यापुढे ग्रामीण भागातल्या शाळा बंद करणार नाही : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा उद्यापासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढील एक आठवड्याची परिस्थिती पाहून पुन्हा पाचवी ते आठवी आणि त्यानंतर पहिली ते पाचवीच्याही शाळा सुरू करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. यानंतर शाळेमध्ये शिक्षक किंवा विद्यार्थी पॉझिटिव्ह निघाला तर शाळा बंद करणार नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. जो विद्यार्थी किंवा शिक्षकांना कोरोनाची लागण होईल त्यांना आसोलेट केला जाईल मात्र, शाळा यापुढे बंद करणार नाही असं देखील जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हटले आहेत. 

13:59 PM (IST)  •  24 Jan 2022

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

राज्यातील अनेक ठिकाणी आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका कमी झाला आहे अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत अध्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे ज्या भागात कोरोनाच्या प्रादुर्भाव नाही अश्या भागात शाळा सुरू करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आग्रही आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील काही शाळा व्यवस्थापन समितीनी जिल्हाधिकाऱ्याना निवेदन देत शाळा लवकर सुरू करण्याची विनंती केली आहे. ग्रामीण भागात अध्याप कोरोनाचा प्रादुर्भाव नाही आहे. अश्या ठिकाणी शाळा सुरू करण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.

10:43 AM (IST)  •  24 Jan 2022

Pre Primary School :शिशुवर्ग, बालवाडी वर्ग दोन वर्षानंतर सुरू, पालकांच्या-मुलांच्या चेहऱ्यावर आनंद

10:40 AM (IST)  •  24 Jan 2022

पारधी मुलांनं शिक्षण देण्यासाठी दोन तरुणांची धडपड, माळरानावर उभारली 'अक्षरभूमी' शाळा

गावातील पारधी मुलांनं शिक्षण मिळावं म्हणून दोन तरुणांनी टिटवा पारधी वस्तीवर तीन वर्षांपूर्वी शाळा सुरु केली. मात्र सभागृहात वर्ग सुरु ठेवण्यास काही लोेकांनी विरोध केला. या दोन तरुणांनी ज्ञानयज्ञ न थांबवता गावातल्या माळरानावर विद्यार्थ्यांसह श्रमदान करत वेगळीच शाळा उभी केलीय.. तर पाहुयात कशी आहे ही 'अक्षरभूमी' शाळा... 

10:39 AM (IST)  •  24 Jan 2022

Maharashtra School Reopen : राज्यात शाळांची घंटा वाजणार मात्र 14 जिल्ह्यांमध्ये शाळा बंदच

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget