School Reopen | अखेर दीड वर्षानंतर शाळेची घंटा वाजली, राज्यात शिक्षणोत्सव, मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद
आज सोमवार 4 ऑक्टोबर राज्यातील शाळा दीड वर्षानंतर सुरु झाल्या आहेत. या निमित्ताने दुपारी 12 नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' या कार्यक्रमांतर्गत ऑनलाइन संवाद साधणार आहेत.
मुंबई : आज(सोमवार 4 ऑक्टोबर) तब्बल दीड वर्षानंतर राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. राज्यभरात या निमित्तानं शिक्षणोत्सव साजरा करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचं अनेक ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात येत आहे. या निमित्ताने दुपारी 12 नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' या कार्यक्रमांतर्गत सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांना सुद्धा हा कार्यक्रम दखविण्यात यावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
शिक्षणोत्सव साजरा केला जाणार :
आज शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे यासाठी शिक्षणोत्सव साजरा केला जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा अनौपचारिक स्वागत केले जाणार आहे. आज उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्राचार्य हे शाळांना भेटी देणार आहेत. सोबतच पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे केलेले स्वागत, नियोजनाचे फोटो समाजमाध्यमावर पोस्ट करण्यास सांगितले आहे. #शिक्षणोत्सव या नावाने फेसबुक, इंस्टा, ट्विटर हे फोटो पोस्ट करण्यात यावेत.
TET Exam : टीईटी परीक्षेची तारीख बदलली, आता 'या' तारखेला होणार परीक्षा
शाळांना दिलेल्या सूचना..
विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गणवेश वाटप करण्यात यावे.
सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे, ज्या शिक्षकांची लसीकरण झालेले नाही त्या शिक्षकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे.
सर्व शाळांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 100% लसीकरण करावे.
लसीकरण झाले नाही म्हणून हे कारण देत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुपस्थित राहता येणार नाही.
राज्यातील बोगस विद्यार्थी होणार उघड, परभणीत आढळले 14 हजार बोगस विद्यार्थी
मुंबईतील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार
दीड वर्षांपासून बंद असलेल्या मुंबईतील शाळा आता 4 ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरातील महानगरपालिका शाळा, खाजगी व्यवस्थापन, इतर सर्व मंडळाच्या शाळांना आठवी ते बारावी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून आयुक्तांपुढे मांडण्यात आला होता. त्याला बीएमसी आयुक्त इकबाल सिंग चहल यांची मंजुरी मिळाली आहे. मुंबई परिक्षेत्रातील आठवी ते बारावीचे वर्ग असणाऱ्या सर्व माध्यमाच्या सर्व बोर्डाच्या एकूण शाळा 2553 आहेत व त्यात एकूण विद्यार्थी 5, 13, 502 विद्यार्थी शिक्षण घेतात.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI