एक्स्प्लोर

मन सुन्न झालंय...आठवडाभरातच 12 घटना, शालेय मुलींवरील अत्याचाराने हादरला 'पुरोगामी महाराष्ट्र'

अत्याचाराच्या घटना वाढत असून घृणास्पद कृत्य करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती राहिली नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठाणे : बदलापूरमध्ये (Badlapur School Abuse)  एका शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचं तीव्र पडसाद मुंबईसह राज्यभर उमटताहेत. अत्याचाराच्या घटना वाढत असून घृणास्पद कृत्य करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती राहिली नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये बलात्कार, लैंगिक अत्याच्याराच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होतानाचं भयावह चित्र आहे.

राज्यात गेल्या 10 दिवसांत आठ जिल्ह्यांत अल्पवयीन मुलींवरच्या अत्याचाराच्या तब्बल 12 घटना समोर आल्यात. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अकोला, लातूरमध्ये गेल्या काही दिवसांत अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचं समोर आलंय. त्यापैकी 11 घटना या गेल्या तीन दिवसांतल्या आहेत. महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणाऱ्या अशा या घटना आहेत.  

 बदलापूरातील शाळेत 2 चिमुकल्यांवर अत्याचार - 13 ऑगस्ट

12 ऑगस्ट रोजी बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत तीन वर्षे आठ महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी पुन्हा सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला.यातील एका मुलीने शारीरिक त्रास होत असल्याचं आपल्या आजोबांना सांगितलं. असाच त्रास मैत्रिणीसोबतही होतोय, असंही या मुलीने सांगितलं. त्यानंतर या मुलीच्या पालकांनी दुसऱ्या मुलीच्या पालकांना संपर्क केला, तर दुसरी मुलगीही शाळेत जाण्यास तयार नसल्याचं त्यांना समजलं. दोन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी केल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं   

पुण्यातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न -15 ऑगस्ट

पुण्यातील भवानी पेठेत हे एक नामांकित शाळा आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पीडित मुलगी शाळेत तिची स्कूल बॅग शोधण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी तरुण हा मुलांच्या स्वच्छतागृहाजवळ थांबला होता. पीडित मुलगी जवळ येताच आरोपीने तिचा हात पकडत तिला जबरदस्तीने स्वच्छतागृहात ओढत घेऊन गेला. यावेळी आरोपीने तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. मात्र पीडित अल्पवयीन मुलीने आपली सुटका करून घेत पळ काढला. घरी केल्यानंतर तिने आईला हा संपूर्ण प्रकार सांगितला.

अकोल्यातील शिक्षकाकडून सहा मुलींचा विनयभंग - 20 ऑगस्टला उघड

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने अश्लिल व्हिडिओ दाखवत सहा विद्यार्थीनींचा छळ केल्याची ही घटना आहे. ही खळबळजनक घटना आज मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली. याप्रकाराने जिल्हाभरात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

ठाण्यात गतिमंद मुलीवर अत्याचार - 20 ऑगस्ट

कळवा रुग्णालय परिसरातील गार्डनमध्ये एका अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंगा करण्यात आला. विनयभंग केल्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आलं होतं. या प्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटिव्ही व तांत्रिक माहितीच्या मदतीने आरोपीला अटक केली आहे. प्रदीप शेळके असं आरोपीचं नाव आहे. कळवा रुग्णालय हे ठाण्याचे एकमेव सरकारी रुग्णालय आहे. 

नाशकात साडेचार वर्षांच्या मुलीचं अपहरण करून अत्याचार - 21ऑगस्ट

साडेचार वर्षे मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.  नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील  वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना घडली आहे. चिमुकली घरासमोर खेळत असताना अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले.   त्याच गावात राहणाऱ्या संशयिताने मुलीची अपहरण करून अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती आहे. मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध घेत मुलीची केली सुटका तर संशयित आरोपीला पोलिसांनी  ताब्यात घेतले.

साडेचार वर्षाच्या मुलीवर लैंगिक छेडछाडची लातूरतील घटना उघड - 20 ऑगस्ट

 चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात साडेचार वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 19 वर्षीय आरोपीच्या घरासमोर चार वर्ष दहा महिन्याची मुलगी राहत होती.  17 तारखेला आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. याची माहिती मुलीने आईला दिल्यानंतर त्या दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाली.  चाकूर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे

कोल्हापुरात दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या -22 ऑगस्ट

कोल्हापुरात दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे.  कोल्हापूरच्या शिये गावातील राम नगर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे.  सबंधित मुलगी काल दुपारपासून बेपत्ता होती . दोघा संशयीताना पोलिसांनी  ताब्यात घेतलं आहे.

 मुंबईत अपंग अल्पवयीन मुलीवर अत्याचार -21 ऑगस्ट

मुंबईत  बुधवारी अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.   कांदिवली परिसरात घरात शिरलेल्या तरुणाने 14 वर्षांच्या अपंग मुलीचा विनयभंग केल्याची घटना भरदिवसा घडली आहे. या प्रकरणी एका आरोपीला कुरार पोलिसांनी अटक झाली आहे.  घटनेच्या दिवशी मुलगी घरी एकटीच होती. तिचे आई-वडील कामावर गेले होते, त्यानंतर तिच्या एकटेपणाचा फायदा घेत आरोपीने जबरदस्तीने तिच्या घरात घुसून मुलीचा विनयभंग केला. यानंतर पीडित मुलगी घाबरली, काही दिवस मुलगी शांत असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले, आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता.  तिने घडलेला प्रकार सांगितला पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबईच्या खारमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा शेजार्‍याकडून विनयभंग -21 ऑगस्ट

मुंबईच्या खार दांडा परिसरात देखील अशीच एक संतापजनक घटना उजेडात आली आहे. यात दोन सख्या अल्पवयीन मुलींचां विनयभंग (Sexual Abuse) झाल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मुलींच्या आई वडिलांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

नागपूरच्या कामठी भागात आठ वर्षीय मुलीवर शेजाऱ्यानेच केला अत्याचार - 21 ऑगस्ट 

नागपूरच्या कामठी भागात आठ वर्षीय मुलीवर शेजाऱ्यानेच अत्याचार  केला आहे.  55 वर्षीय आरोपी धनीराम वासनिक याला पोलीसांनी अटक केली. चॉकलेट देण्याच्या आरोपीने पीडित मुलीला आपल्या घरी नेऊन कृत्य केले . त्यानंतर चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती . पीडितेने हा सर्व आईला सांगितल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्या नंतर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली.

अल्पवयीन तरुणीवर मैत्रिणीच्या मदतीने २ मित्रांनी केला अत्याचार - 21 ऑगस्ट

 हा सगळा प्रकार एप्रिल महिन्यात घडला आहे. पीडित तरुणी आणि तिची मैत्रीण हे घराजवळ राहतात त्यामुळे त्यांची पहिल्यापासूनच ओळख होती. आरोपी मैत्रिणी हिने पीडित तरुणी हिला घेऊन तिच्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी नेले. पीडित तरुणीला रिक्षात बसवून मैत्रिणीने तिच्या मित्रांना सुद्धा पार्टीसाठी बोलवले होते. मित्राच्या घरी हा सगळा प्रकार घडला. पार्टीच्या ठिकाणी गेल्यावर पीडित तरुणीला तिच्या मैत्रिणीने जबरदस्तीने तिला दारू पाजली आणि त्यानंतर तिच्या मित्रांनीच तिच्यावर बलात्कार केला. दारूच्या नशेत असलेल्या पिढीत तरुणीला या सगळ्या बाबत काहीच कल्पना नव्हती याचाच फायदा घेत एका तरुणाने या ठिकाणी या घटनेचा व्हिडिओ देखील मोबाईलवर रेकॉर्ड केला. 

चांदिवलीमध्ये तीन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार - 20 ऑगस्ट

चांदिवलीतील संघर्ष नगर परिसरात राहणाऱ्या 16 वर्षाच्या कट्टरपंथीय युवकाने तीन वर्षाच्या कन्येवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.    लैंगिक अत्याचार करणाऱ्या युवकाला, त्याच्या कृत्याची त्वरित शिक्षा मिळावी तसेच त्यावर अनुसूचीत जातीच्या मुलीचे शोषण केल्याबद्दल सुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी पीडितेच्या आईने केली आहे. मंत्री लोढा यांनी या मागणीला अनुसरून प्रशासनाला त्वरित कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा :

धक्कादायक! मुंबईच्या खार मध्ये दोन अल्पवयीन मुलींचा शेजार्‍याकडून विनयभंग, परिसरात संतापाची लाट

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषणDilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हानPriyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
×
Embed widget