Result : प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर, असा पाहा निकाल
इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीच्या वर्गासाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून तो परिषदेच्या संकेतस्थळावर पाहता येईल.
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 12 ऑगस्ट, 2021 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी आज परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली. www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यास बैठक क्रमांक टाकून पाहता येईल. शाळेस त्यांच्या लॉगीनमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल एकत्रितपणे पाहता येणार आहे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) परीक्षेसाठी एकूण 3 लाख 88 हजार 515 नोंदविलेल्या विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 37 हजार 370 विद्यार्थी उपस्थित होते. तर 37 हजार 871 विद्यार्थी अनुपस्थित होते. 57 हजार 334 पात्र विद्यार्थी आहेत. तर 14 हजार 250 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक जाहीर झाली आहे. पात्र विद्यार्थी संख्येनुसार 16.9944 टक्के निकाल आहे.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) परीक्षेसाठी एकूण 2 लाख 44 हजार 314 नोंदविलेल्या विद्यार्थ्यांपैकी 2 लाख 10 हजार 338 विद्यार्थी उपस्थित होते. तर 22 हजार 814 विद्यार्थी अनुपस्थित होते. 23 हजार 962 विद्यार्थी पात्र ठरले. तर 10 हजार 736 शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आहेत. पात्र विद्यार्थी संख्येनुसार 11.3921 टक्के निकाल आहे. परिषदेच्या संकेतस्थळावर अंतिम गुणपत्रक उपलब्ध आहे. छापील गुणपत्रक व प्रमाणपत्र शाळांना पाठविण्यात येणार आहेत.
2017-18 या शैक्षणिक वर्षापासून रद्द प्रश्नांचे गुण कमी करून उर्वरित अचूक प्रश्नांच्या प्राप्त गुणांवरून शेकडा गुणांवरून गुणवत्ता याद्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :