एक्स्प्लोर

Pune Corona : पुणेकरांनो काळजी घ्या! कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे राज्यात 20 तर एकट्या पुण्यात 13 रुग्ण

राज्यात नव्या कोरोना व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे. त्यातील धक्कादायक बाब म्हणजे 20 रुग्णांपैकी 13 रुग्ण हे पुण्यातील आहे. राज्यात तीन नव्या कोरोना व्हेरियंटचे 20 रुग्ण आढळले आहेत.

Pune Corona : राज्यात नव्या कोरोना व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे. त्यातील धक्कादायक बाब म्हणजे 20 रुग्णांपैकी 13 रुग्ण हे पुण्यातील आहे. राज्यात तीन नव्या कोरोना (Corona) व्हेरियंटचे 20 रुग्ण आढळले आहेत. एक्सबीबी या व्हेरियंटचे 18 नवे रग्ण आढळले आहेत. तर बीक्यू.1 आणि बीए.2.3.20 या व्हेरियंटचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. नव्या कोरोना रुग्णांमुळे कोरोना विषाणूचा फैलाव आणखी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना काळजी घेण्याची गरज आहे. 

दिवाळीच्या खरेदीसाठी पुणेकरांनी चांगलीच गर्दी केली होती. बाजारांना अक्षरश: जत्रेचं स्वरुप आलं होतं. दोन वर्षांनी यंदाची दिवाळी निर्बंधमुक्त होणार आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच घरात उत्साहाचं वातावरण आहे. खरेदी, सजावट आणि फराळाची लगबग सुरु आहे. यातच ही बातमी पुणेकरांची चिंता वाढवणारी आहे.

इन्साकॉग प्रयोगशाळांच्या ताज्या अहवालानुसार, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये राज्यात एक्सबीबी या व्हेरियंटचे एकूण 18 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 13 रुग्ण हे पुण्यातील आहेत. नागपूर आणि ठाणे येथील प्रत्येकी दोन तर अकोला येथील एक रुग्ण आहे. या शिवाय पुण्यातच बीक्यू.1 आणि बीए.2.3.20 या व्हेरियंटचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. या सर्व रुग्णांची साथरोग शास्त्रीय माहिती घेण्यात येत असून प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे सर्व रुग्ण सौम्य स्वरुपाचे आहेत. 

पुण्यातील बीक्यू.1 रुग्ण सौम्य स्वरुपाचा असून त्याचा अमेरिका प्रवासाचा इतिहास आहे. जनुकीय रचनेमध्ये बदल होत राहणे हा विषाणूच्या नैसर्गिक जीवनक्रमाचा एक भाग असून त्यामुळे घाबरुन न जाता कोविड संदर्भात आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. योग्य ती काळजी घेतल्यास दिवाळीनंतरही ही संख्या आटोक्यात राहिल, असंही आरोग्य विभागाने सांगितलं आहे. 

पुणेकरांनो काळजी घ्या
दोन वर्षांनी सगळीकडे निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होणार आहे. त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर उत्साहाचं चित्र आहे. दोन वर्षांनी बाजारपेठाही सजल्या आहे. उपयोगी वस्तू आणि बाकी खरेदीसाठी पुणेकर मध्यवर्ती परिसरात गर्दी करत आहेत. तुळशीबाग, रविवार पेठ, रास्ता पेठ, डेक्कन परिसरात नागरीकांची तुफान गर्दी बघायला मिळत आहे. मात्र यातच पुणेकरांनी स्वत:ची काळजी घेण्याची देखील गरज आहे. कोरोना अजून भारतातून गेला नाही आहे. रोज नवे व्हेरियंट्स आढळत आहे. या व्हेरियंट्सचे राज्यातील अधिक रुग्ण पुण्यात आहेत. त्यामुळे घाबरुन न जाता कोरोना संदर्भात आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानियाAkola : अकोल्याच्या बाळापूरात क्षारयुक्त पाणी प्यावं लागत असल्यानं शेकडो ग्रामस्थांना किडनीचे आजारJob Majha | केंद्रीय रस्ते संशोधन संस्था येथे नोकरीच्या संधी | 01 April 2025 | ABP MajhaManoj Jarange on Beed : कळंब महिला हत्या प्रकरणावर मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल  2025 | मंगळवार
Manoj Jarange : फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील : मनोज जरांगे
Embed widget