Maharashtra Rain Update : अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे रायगडसह विदर्भातील चार जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, तर कोल्हापुरात पुरस्थिती पाहून शाळा भरवण्याचे आदेश
Maharashtra Rain Update : राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले असून अनेक नद्यांना पूर आलाय.
Maharashtra Rain Update : राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले असून अनेक नद्यांना पूर आलाय. शिवाय सोमवारी (दि.22) काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. रायगड, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, गडचिरली या जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर जाहीर करण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा अंदाज घेऊन शाळा भरवा. नादुरुस्त किंवा धोकादायक इमारतीमध्ये शाळा भरू नयेत, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.
रायगड जिल्हयातील पावसाचा वाढता जोर पाहता महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत या तालुक्यातील शाळांना उद्या दि. 22 जुलै रोजी जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अंगणवाडी, प्राथमिक माध्यमिक, कॉलेज या सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली असून रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांनी यासंदर्भातील आदेश काढत ही माहिती दिली आहे.
इरई धरणाची सर्व 7 दारे पुन्हा 1 मीटरने उघडली
चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणाची सर्व 7 दारे पुन्हा 1 मीटरने उघडली आहेत. 462 क्यूसेक्स वेगाने धरणातील पाण्याचा इरई नदीपात्रात विसर्ग होतोय. सध्या वर्धा नदीत पाणी कमी असल्याने इरई नदीतील पाणी वेगाने पुढे जात आहे. मात्र गोसेखुर्द धरणाचा विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली तर त्याचा आधी वर्धा आणि त्यानंतर इरई नदीच्या पाणीपातळीवर परिणाम होणार आहे.
गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं मुसळधार पाऊस
गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं मुसळधार पाऊस पडत आहे. यासोबतच धापेवाडा बॅरेजचे 21 गेट चार मीटरनं उघडण्यात आले असून त्यातून 2 लाख 85 हजार 768 क्युसेक पाण्याचा होत असलेला विसर्ग हा गोसीखुर्द धरणात विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी, गोसीखुर्द धरणाच्या जलसाठ्यात झपाट्यानं वाढ झाली आहे. गोसीखुर्द धरणाचा जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी आता गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे एक मीटरनं उघडण्यात आले आहे. सध्या गोसीखुर्द धरणातून 2 लाख 47 हजार 776 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यापूर्वी गोसीखुर्द धरणाचे 23 गेट एक मीटरनं तर 10 गेट अर्धा मीटरनं सुरू करण्यात आली होती. त्यात आता धरणाच्या जलसाठ्यात झपाट्यानं वाढ झाल्यानं आता सर्वच्या सर्व 33 गेट एक मीटरनं उघडण्यात आली आहे. मागील दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळं गोसीखुर्द धरणातून विसर्ग करण्यात येणाऱ्या जलसाठ्यात आता वाढ केली आहे. त्यामुळे नदी काठावरील ग्रामस्थांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
गडचिरोली, रायगडमध्ये शाळांना सुट्टी, पवईत तलावातून मगरी बाहेर आल्या, महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटींग