गडचिरोली, रायगडमध्ये शाळांना सुट्टी, पवईत तलावातून मगरी बाहेर आल्या, महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटींग
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात आज पावसाने तुफान बॅटींग केली आहे. जोरदार पाऊस झाल्याने आणि पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता असल्याने गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात आज पावसाने तुफान बॅटींग केली आहे. जोरदार पाऊस झाल्याने आणि पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता असल्याने गडचिरोली, रायगड आणि नागपूर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. शिवाय, मुंबईतील पवई तलावाचा जलस्तर वाढलाय, पवई तलावातील मगरी बाहेर आल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांना पवई तलावाच्या परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
गडचिरोली जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाली आहे. अनेक मार्ग बंद झाले आहेत तर काही गावांना पुराचा फटका बसलाय. सोबतच गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण गडचिरोली जिल्हा सीमाक्षेत्रामध्ये दिनांक 22 जुलै, 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आले आहे.
नदीपात्रातील छोटे काजवे आणि काही छोटे ब्रिज पाण्याखाली
भारतीय हवामान खात्याने पुढील 3 तासासाठी रायगड या जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क रहावे, असा इशारा मंत्रालय नियंत्रण कक्षाने दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत उगम पावणाऱ्या अर्जुना नदीला देखील पूर आला आहे. त्यामुळे नदीपात्रातील छोटे काजवे आणि काही छोटे ब्रिज पाण्याखाली गेले आहेत. मागील आठ दिवसांपासून या भागाला पावसाने चांगलं झडपून काढला आहे. शिवाय, अर्जुना धरणाचे पाणी देखील सोडले जात असल्याने काही वाड्या वास्त्यांचा मुख्य गावांपासून संपर्क तुटला आहे. तसेच भात शेती देखील पाण्याखाली गेली आहे. दरम्यान रायपाटण या गावातील गांगणवाडीचा मुख्य गावापासून संपर्क मागच्या काही दिवसांपासून पावसामुळे सातत्याने तुटत आहे. शिवाय नदी पार करताना भीतीची छाया नागरिकांच्या मनावरती असते. त्यामुळे या ठिकाणी मोठा ब्रिजची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
जवाहर चौकात पुराचे पाणी
राजापूर शहर बाजारपेठ पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय. मागील दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूल पाण्याखाली गेलाय. पुन्हा एकदा राजापूरची बाजारपेठ पाण्यामध्ये गेली आहे. अर्जुना तसेच गोदवली नदीचा राजापूरच्या बाजारपेठेला वेढा बसलाय. शिवाय कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा गगनबावडा कोल्हापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. असळज ते साळवण दरम्यान खोकुर्ले येथे पाणी आल्याने तसेच गगनबावडा ते कोल्हापूर रस्ता पाणी आल्याने बंद झाला आहे.
रत्नागिरीतील प्रसिद्ध पीर बाबर शेख मंदिर पाण्याखाली
रत्नागिरी जवळच्या हातीस गावातील हे मंदिर पाण्याखाली गेले आहे. मंदिरात जवळपास पाच फूट पाणी साचलय. काजळी नदीचं पाणी शिरलं पीर बाबर शेख मंदिरात गेलं आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रतीक असलेलं हे मंदिर आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Mumbai Rain Marin Drive : मुसळधार पाऊस,खवळलेला समुद्र, उंच लाटा; मरिन ड्राईव्हवरुन LIVE