एक्स्प्लोर

Maharashtra Rain : राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस; रब्बी पिकांना मोठा फटका, बळीराजा चिंतेत

Maharashtra Rain : हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) जोरदार हजेरी लावली आहे.

Maharashtra Rain : हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) जोरदार हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची (Farmers) चिंता वाढली आहे. कारण काही ठिकाणी या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. रब्बी पिकांचं तसेच फळबागांचं नुकसान झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. पाहुयात कुठे कुठे पाऊस झाला....

नांदेड : वादळी वाऱ्यासह गारपीट, एकाचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड तालुक्यात सायंकाळी जोरदार गारपीट झाली. गारपिटीमुळे रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बारड येथे घर कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव, चनापूर, पाटणूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. केळीच्या बागांना मोठा फटाका बसला. वीजवितरण कंपनीचे विद्युत खांब, तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. हरभरा, गहू आंबा आदी पिकांना फटका बसल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मुदखेड तालुक्यात वादळी पाऊस आणि गारपीट झाली. यामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नांदेड-मुदखेड मार्गावर काही ठिकाणी झाडे पडली आहेत. हदगाव तालुक्यालाही वादळी पावसाचा तडाखा बसला. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

सोलापूर 

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ, सदलापूर, बादोला, सापळा, किनिमोड या भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ज्वारी, गहू, हरभरा, करडी यासारख्या काढणीला आलेल्या पिकांना यामुळे फटका बसला आहे. जोरदार वाऱ्यासह पावसाने झोडपून काढल्यामुळे आंब्याच्या फळबागेला नुकसानीचा सामना करावा लागणार आहे.

अहमदनगर

अहमदनगर शहरासह परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे गहू, कांदा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. श्रीगोंदा येथील सांगवी दुमला गावात नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याची घटना घडली. 

रायगड

रायगड जिल्ह्यातील नावंढे, देवन्हावे गाव आणि परिसर, डोलवली, घोडीवली, कोलाड, रोहा, कर्जत पेणमध्ये अवकाळी पाऊस पडला.  

बारामती तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

बारामती तालुक्यातील बहुसंख्य ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. बारामतीसाह इंदापूर, दौंड तालुक्यात काही ठिकाणी पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या काढण्यास आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस 

हवामान विभागाने वर्तवलेला अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस झाल्यानं शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. गहू, ज्वारी, हरभरा यासह संत्रा, मोसंबी आणि आंब्यांच्या बागांचे या पावसामुळे नुकसान होणार आहे.

जालना जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

हवामान खात्याच्या अंदाजानुसार जालना जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील जालना, भोकरदन, बदनापूरसह मंठा तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे गहू, ज्वारी, हरभरा पिकांसह मोसंबी , द्राक्ष आणि आंब्याच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. 

मुंबईसह ठाण्यातही पाऊस

मुंबईमध्येही विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तसेस ठाणे जिल्ह्यातहीअवकाळी पावसाने लावली हजेरी लावली. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. उकाड्याने हैराण झालेले नागरिक सुखावले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

Mumbai Rain : मुंबईसह ठाण्यात 'अवकाळीच्या सरी', उकाड्यापासून दिलासा मात्र, आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
Jayant Patil on Ajit Pawar : श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
शासनाची जन्म-मृत्यू नोंदणी वेबसाईट 15 दिवसांपासून बंद; अर्जासाठी लागतायत 15 ते 20 दिवस, नागरिकांची तारांबळ
शासनाची जन्म-मृत्यू नोंदणी वेबसाईट 15 दिवसांपासून बंद; अर्जासाठी लागतायत 15 ते 20 दिवस, नागरिकांची तारांबळ
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट; वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली, विधानसभा लढवणार
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट; वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली, विधानसभा लढवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi NewsABP Majha Headlines 1PM एबीपी माझा हेडलाईन्स 1 PM 04 July 2024 Marathi NewsPolice Constable Suspended : ललित पाटीलसोबत एक्सरेसाठी पोलिस गेलेच नसल्याचा ठपका, दोघेजण बडतर्फRohit Pawar on Dhananjay Munde : परळीत वाल्मिक कराडांची दहशत, धनुभाऊंचं काही चालत नाही...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
Jayant Patil on Ajit Pawar : श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
शासनाची जन्म-मृत्यू नोंदणी वेबसाईट 15 दिवसांपासून बंद; अर्जासाठी लागतायत 15 ते 20 दिवस, नागरिकांची तारांबळ
शासनाची जन्म-मृत्यू नोंदणी वेबसाईट 15 दिवसांपासून बंद; अर्जासाठी लागतायत 15 ते 20 दिवस, नागरिकांची तारांबळ
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट; वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली, विधानसभा लढवणार
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट; वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली, विधानसभा लढवणार
मोठी बातमी: अंबादास दानवे उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाच्या कालावधीत दोन दिवसांची कपात
मोठी बातमी: अंबादास दानवे उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाच्या कालावधीत दोन दिवसांची कपात
MLA Sunil Shinde: मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
Anant Amabni-Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नात परफॉर्म करणार जस्टीन बीबर, मानधनाचा आकडा किती?
अनंत-राधिकाच्या लग्नात परफॉर्म करणार जस्टीन बीबर, मानधनाचा आकडा किती?
काही काळजी नाही, बहिण विधानपरिषदेवर आली, भाऊपण येणार, महादेव जानकरांची नेमकी अपेक्षा काय?
काही काळजी नाही, बहिण विधानपरिषदेवर आली, भाऊपण येणार, महादेव जानकरांची नेमकी अपेक्षा काय?
Embed widget