एक्स्प्लोर

Maharashtra Rain : आभाळ फाटलं! 'गुलाब' वादळाचे 'काटे' शेतकऱ्यांच्या अंगाला, बळीराजाचं अतोनात नुकसान

Maharashtra Rain Update : गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यासह (Marathwada Rain Update)  राज्यातील काही भागात तुफान पाऊस कोसळत आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

Maharashtra Rain Update : गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यासह (Marathwada Rain Update)  राज्यातील काही भागात तुफान पाऊस कोसळत आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.  हजारो हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. काही ठिकाणी पिकं सडली आहेत तर सोयाबीन जागेवरच उगवत असल्याचं देखील समोर आलं आहे. या नुकसानीमुळं शेतकरी हवालदिल झाला असून सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे. गुलाबी वादळामुळं झालेल्या पावसानं काटे मात्र शेतकऱ्यांच्या अंगाला रुतले आहेत. 

पावसामुळं मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची 'सीईटी' पाण्यात!, शेकडो विद्यार्थ्यांना फटका, पुन्हा परीक्षा घेणार असल्याची CET सेलची माहिती

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गुलाबी वादळाचा मोठा फटका, हजारो हेक्टर वरील पिके पाण्याखाली 

नांदेड जिल्ह्यात सर्वत्र अति मुसळधार पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक छोट्या-मोठ्या नद्यांना महापूर आला आहे. शेत-शिवारासह अनेक गावातही पाणी शिरले आहे. यामुळे अर्धापूर तालुक्यातील शेलगाव, पिंपळगाव, सांगवी, मेंढला, शेणी या गावांचा संपर्क तुटला आहे. तर काढणीस आलेले सोयाबीन पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पैनगंगा नदीवरील इसापूर धरणाचे अकरा तर गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले असून नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. पावसामुळं खरीप पिकासह बागायती पिकांना फटका जिल्ह्यात गुलाबी वादळाचे काटे शेतकऱ्याचा अंगाला रुतले आहेत. नदीकाठच्या शेतजमीनी खरडून गेल्या आहेत. तर सोयाबीन, कापूस खरीप पिकासह हळद, केळी, ऊस बागायती पिकांनाही मोठा फटका बसला आहे. सततच्या होणाऱ्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदील झाला आहे.जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीनांदेड जिल्ह्यात रात्रीपासून सर्वदूर अतिवृष्टी झाली आहे. नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी. असा इशारा देण्यात आला आहे.

वाशीम जिल्ह्यात पावसाचा कहर
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून वाशीम जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. काढणीला आलेले सोयबीन, उडीद, मुग  पिकांचं मोठं नुकसान  झाल आहे. मात्र अद्याप पंचनामे झालेले नाहीत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने टोगावातील शेतशिवार परिसरात नुकसानग्रस्त शेतातील चिखलात बसून आंदोलन करण्यात आले.   नुकसान भागाचे सर्वे  होऊन  भरपाई मिळावी अशी मागणी आता स्वाभिमानी कडून करण्यात येत आहे  

जळगाव जिल्ह्यातही कहर, चाळीसगावातील अनेकांना सुरक्षित स्थळी हलवले
जळगाव जिल्ह्यातही पावसाचा कहर सुरु आहे. मध्यरात्री पावसाचा जोर वाढल्याने डोंगरी आणि तितूर नदीला आलेल्या पुरामुळे  चाळीसगाव शहरातील अनेक भागात पाणी शिरल्यानं या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची वेळ आली.  यामध्ये शंभरहून अधिक जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.  यंदा महिना भरात पाच मोठे पूर डोंगरी आणि तितुर नदीला आल्याने या नदीकाठच्या परिसराला त्याचा मोठा फटका बसला आहे. मागील चोवीस तासात ही चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असल्याने त्याचा परिणाम म्हणून तितूर नदीला पूर आला असल्याने शहरातील नदीच्या पुलावर पाणी वाहत आहे. यामुळं शहर दोन भागात विभागले गेले असल्याचं दिसून आले होते. मध्यरात्रीच्या सुमारास पाण्याची पातळी वाढल्याने नदी काठ परिसरात असलेल्या शहरातील दर्गा परिसर,मोची गल्ली,एकलव्य नगर परिसरात नागरिकांच्या घरात कंबरेएवढं पाणी शिरल्याने घरातील सामानाचं नुकसान झालं असल्याचं पाहायला मिळाले.  

Maharashtra Rain LIVE Update : मराठवाडा, विदर्भासह राज्यभरातील पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...

नाशिकमध्येही स्थिती बिकट, गोदावरी काठावर राहणाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आलाय, मात्र कधी आणि किती विसर्ग केला जाणार याबाबत प्रशासनाकडून व्यवस्थित माहिती दिली जात नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे,  गेल्या तीन चार दिवसांपासून हळूहळू पाण्याचा विसर्ग वाढविला असता तर अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्याची वेळ आली नसती अशी भूमिका गोदाकाठी राहणारे स्थानिक नागरिक मांडत आहेत. दुपारपर्यंत भांडी बाजारात पाणी जाण्याची शक्यता आहे.  जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.  काल दिवसभर शहरात संततधार सुरू होती, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ही मुसळधार पाऊस सुरू असल्याने तुडूंब भरलेल्या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जात आहे, सकाळ पासून 5 हजार क्युसेक वेगाने गंगापूर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग दुपारी 12 नंतर 15 हजार केला जाणार आहे, त्यामुळे गोदावरी नदीला महापूर येण्याची शक्यता आहे.  जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या sop नुसार पूर नियंत्रणाचे काम यंत्रणेच्या माध्यमातून केले जाणार आहे.  पालखेड ,दारणासह सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आलाय लासलगाव, येवला नांदगाव या भागात ही जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं असून काही नागरिकांच्या घरात, दुकानात देखील पाणी शिरल्याच्या घटना घडल्यात.  घोटी, इगतपुरी, सुरगाणा या तालुक्यात ही पावसाची जोर असल्यानं जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आलं आहे. येवला शहरातील शनिपटांगण भागातील अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.तर येवला तालुक्यातील अनेक छोटे-मोठे बंधारे भरून वाहू लागल्याने शेतात पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

बुलढाणा  जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, जिल्ह्यातील अनेक महामार्ग बंद
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 36 तासापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने अनेक भागात हाहाकार उडवला आहे. जिल्ह्यातील छोट्या मोठ्या सर्वच नद्यांना पूर आला आहे. बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर असंख्य गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून काल रात्रीपासून गावे अंधारात आहेत व आजही अंधारातच राहणार चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग नद्यांना आलेल्या पुरामुळे बंद असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.  जिल्ह्यातील पैनगंगा, विश्वगंगा, बाणगंगा, धामना, पेन, कोराडी, यासह छोट्या मोठ्या नद्या व नाल्यांना पूर आले आहेत.  जिल्ह्यातील 9 ठिकाणी रस्ते बंद झाले असून त्या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.  जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती टीम सर्व बाबीवर लक्ष ठेवून सतर्क आहे.  जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत 3 जण वाहून गेल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तसेच या पावसाने ग्रामीण भागातील असंख्य घरांची पडझड झाल्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. पाऊस असल्याने प्रत्यक्ष पाहणी करता येत नसल्याचे सांगण्यात आले आहे . तर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक मात्र नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.  

पालघर जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा

पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची पाळी आली आहे. तर नदी नाले ओसंडून वाहायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठे पाणी क्षमता असलेल्या धामणी धरणाचे रात्री दहा वाजता पाचही दरवाजे 50 सेंटिमीटरने उघडण्यात येणार असून धामणी आणि कवडास मिळून 13 हजार 900 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुर्या नदी द्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे

 उस्मानाबादमध्येही नदीकाठच्या गावांमध्ये पाणी
 उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने मंगळवारी 459 पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी आणि 16 अन्य बाधितांना एनडीआरएफ टीमच्या मदतीने वाचवण्यात यश मिळवले.  जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या 136.78 टक्के पाऊस झाला आहे.  त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले.  काही गावांमध्ये गावकरी पुराच्या पाण्यात अडकले. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने ग्रामस्थांचे बचाव कार्य सुरू केले.  परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी आणि 16 लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ टीमची मागणी केली, तर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातून 459 लोकांना बाहेर काढले.  प्रमुख मांजरा धरणाच्या धरण क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे या धरणाचे सर्व दरवाजे काल उघडण्यात आले.  यामुळे धरणाच्या खाली असलेल्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. कळंब तालुक्यातील वाकडीवाडी येथे एका फार्म हाऊसमध्ये तीन कुटुंबातील एकूण 20 लोक अडकले होते.  जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने त्या सर्वांना सोडले आहे.  तेरणा नदीकाठी असलेल्या तेर, रामवाडी, इर्ला आणि दौतपूर गावांमध्ये आलेल्या पुरामुळे लोकांना प्रशासनाने शाळा आणि इतर सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे हेलिकॉप्टर पाठवण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार, दौतपूर येथील शेतात अडकलेल्या सहा व्यक्तींना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.  त्यात चार प्रौढ आणि दोन मुले होती. तसेच, जिल्हा आपत्ती प्राधिकरणाची एक टीम आणि एक बोट तसेच NDRF ने कळंब तालुक्यातील सौंदना येथे पुरामुळे अडकलेल्या 10 लोकांना वाचवले.  (NDRF) टीम तसेच तीन बोटी आणि हेलिकॉप्टरची सुटका करण्यात आली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील रामवाडीतील सुमारे 125 लोकांसह, इर्ला येथील सुमारे 114 लोक, तेर येथील सुमारे 35 लोक, दौतपूरचे सुमारे 90 लोक, बोरखेडा येथील सुमारे 35 लोक, कामगावचे सुमारे 40 लोक आणि वाकडीवाडीतील 20 लोकांसह एकूण 439 लोक  त्यांना बाहेर काढण्यात आले आहे.   

रेड व ऑरेंज अलर्ट असलेल्या जिल्ह्यांच्या प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश 
बंगाल उपसागरातल्या गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी, पुरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेले जलसंपदामंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. उस्मानाबाद जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल पूरग्रस्त मराठवाड्यात पाठवण्यात आले असल्याचेही त्यांना सांगितले. 
अरबी समुद्रात शाहीन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवल्यानं रेड अलर्ट असलेल्या पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना, जळगाव या जिल्ह्यांच्या तसंच ऑरेंज अलर्ट असलेल्या मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांच्या प्रशासनाला अधिक सतर्क राहण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. राज्य व जिल्ह्यांच्या आपत्कालिन मदत यंत्रणांनी सतर्क आणि परस्परांच्या संपर्कात राहून आपत्तीग्रस्तांसाठी बचाव व मदतकार्य तात्काळ सुरु करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हा आपत्कालिन मदत यंत्रणांना दिल्या आहेत.   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget