एक्स्प्लोर

मुंबईसह राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला, रायगडमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस, काही भागात जनजीवन विस्कळीत

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. पावसामुळं वाहतुकीवर देखील परिणाम होत असल्याचे दिसत आहे. मुंबईसह रायगडमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे.

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. पावसामुळं वाहतुकीवर देखील परिणाम होत असल्याचे दिसत आहे. मुंबईसह रायगडमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. रायगडच्या लोणेरे विभागातील उनेगाव वावे गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. उनेगाव वावे गावात मुसळधार पावसामुळे पाण्याचे लोंढे वाहू लागलेत. सलग अर्धा तास कोसळलेल्या पावसामुळे गावाला नदीचे स्वरुप आले आहे. राज्याच्या इतरही भागात जोराचा पाऊस झाला आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

ठाण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.  
सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. वंदना डेपो परिसरात पुन्हा  पाणी साचले आहे. सक्षम पंप लावून सुद्धा पाण्याचा निचरा होत नाही. संपूर्ण रस्ते जलमय झाले आहेत. मध्य रेल्वे वरती अद्याप कोणताही परिणाम नाही वाहतूक सुरळीत सुरु आहे.

मुंबईमध्ये मागील जोरदार पावसाला सुरुवात

हवामान खात्याने पुढील 24 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. तो अंदाज खरा ठरताना पाहायला मिळतोय. मुंबईमध्ये मागील अर्ध्या तासापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मरीन ड्राईव्ह परिसरात तर पावसाने अक्षरशः झोडपून काढलं आहे. रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली असून, नागरिक छत्र्यांचा आधार घेत पावसातून वाट काढताना दिसत आहेत. यामुळे काही ठिकाणी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. 

भिवंडी शहर व ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस

भिवंडी शहर व ग्रामीण भागामध्ये अचानक पावसाने दमदार हजेरी लावली आहे. भिवंडी अनेक ठिकाणी पावसाच्या पाणी सकल भागात साचण्यास सुरुवात झाले आहे. वलपाडा परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. शिवाय या परिसरात केमिकल गोदामाला आग लागली असून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. पावसाच्या अचानक हजेरीमुळे नागरिकांचे एकच तारांबळ उडाली आहेत.

अमरावती शहरासह अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस

अमरावती शहरासह अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. बच्चू कडू यांनी उपोषण केलेल्या मोझरीमध्येही मुसळधार पाऊस सुरु आहे. ज्या ठिकाणी बच्चू कडू उपोषणाला बसले त्या मंडपात पाणीच पाणी साचलं आहे. 

फलटण तालुक्यात मुसळधार पाऊस, रस्त्यांना आले ओढ्याचे स्वरूप

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील पश्चिम भागात खडकी, मिरगाव खिंड परिसरात आज मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे या भागातील तलाव ओव्हर फ्लो झाल्याने संपूर्ण पाणी हे फलटण सातारा रोडवर आल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली.फलटण ते आदर्की फाटा रस्त्याचे सध्या काँक्रीट करण्याचे काम जोरदार सुरू आहे त्यातच मोठ्या प्रमाणावर  पडलेल्या  पावसामुळे संपूर्ण रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले होते.

गोंदिया जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये जोरदार पाऊस

गोंदिया जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये आज सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. मृग नक्षत्र लागला असला तरी गोंदिया जिल्ह्यात अद्यापही पाऊस आलेला होता त्यामुळे धान पिकाची पेरणी खोडांबलेली होती मात्र आज झालेल्या पावसामुळे आता धान पिकाच्या पेरणीला वेग येणार असून या पावसामुळे नागरिकांची उकड्यापासून सुटका झालेली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Video : महाराष्ट्रात 12 ते 20 जून मुसळधार पाऊस, तळी भरुन वाहणार; पंजाबराव डख यांचा अंदाज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gopichand Padalkar on Jayant Patil: राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही; गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना इशारा
राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही; गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना इशारा
Sanjay Shirsat on Farmer Protest Video: घरी बोलावून शेतकऱ्यांचं उपोषण का सोडलं? संजय शिरसाटांचं अजब स्पष्टीकरण; म्हणाले, उपोषणकर्त्याचे वडील...
घरी बोलावून शेतकऱ्यांचं उपोषण का सोडलं? संजय शिरसाटांचं अजब स्पष्टीकरण; म्हणाले, उपोषणकर्त्याचे वडील...
Gondia News : माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे वृद्धापकाळाने निधन; जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे निधन; जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
Pune Shaniwar wada: शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Munde : मन साफ असेल तर नियती सुद्धा आपल्यासोबत राहते - धनंजय मुंडे
Sanjay Raut Vs Navnath Ban भाऊ बंदकी मिटवण्यासाठी राज ठाकरेंकडे शिवसेनेचं नेतृत्व द्या,बन यांची टीका
Eknath Shinde :'पूर्वी भाऊबंदकी नाटक गाजलं आता मनोमिलन नाटक सुरू', शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला
Parbhani Farmer On Sanjay Shirsat : शिरसाट यांनी राजीनामा द्यावा, परभणीचे शेतकरी शिरसाटांवर संतापले
Sanjay Shirsat : उपोषणकर्त्याला घरी बोलावलं, शिरसाटांची सारवासारव, म्हणाले 'चूक नाहीच'

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gopichand Padalkar on Jayant Patil: राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही; गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना इशारा
राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही; गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना इशारा
Sanjay Shirsat on Farmer Protest Video: घरी बोलावून शेतकऱ्यांचं उपोषण का सोडलं? संजय शिरसाटांचं अजब स्पष्टीकरण; म्हणाले, उपोषणकर्त्याचे वडील...
घरी बोलावून शेतकऱ्यांचं उपोषण का सोडलं? संजय शिरसाटांचं अजब स्पष्टीकरण; म्हणाले, उपोषणकर्त्याचे वडील...
Gondia News : माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे वृद्धापकाळाने निधन; जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे निधन; जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
Pune Shaniwar wada: शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
Shahid Afridi : आपण मुस्लिम, उपकार विसरलात का?; अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?
आपण मुस्लिम, उपकार विसरलात का?; अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?
Harmanpreet Kaur Ind vs Eng : पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
Pune Shanivar Wada: कुणीही आपण सरकार असल्याच्या थाटात वागू नये, शनिवार वाड्याबाहेरच्या राड्यावरुन नीलम गोऱ्हेंचा मेधा कुलकर्णींना टोला
कुणीही आपण सरकार असल्याच्या थाटात वागू नये, शनिवार वाड्याबाहेरच्या राड्यावरुन नीलम गोऱ्हेंचा मेधा कुलकर्णींना टोला
Embed widget