मुंबईसह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार बॅटिंग, उष्णतेपासून मुंबईकरांना दिलासा, लोकल सेवेवर परिणाम
राज्यातील वातावरणात आज मोठा बदल (Climate Change) झाला आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, सध्या मुंबईत (Mumbai) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे.

Mumbai Rain : राज्यातील वातावरणात आज मोठा बदल (Climate Change) झाला आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, सध्या मुंबईत (Mumbai) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. सकाळनंतर आता पुन्हा सायंकाळच्या वेळेस पावसाने मुंबईत जोरदार बॅटिंग सुरु केल्यानं मुंबईकरांची धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं. या वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाचा लोकलसेवेवर परिणाम झाला आहे. 10 मिनीटांनी लोकल उशीरा धावत आहेत.
लोकल रेल्वे सेवेवर परिणाम
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मागचा 15 ते 20 मिनिटांपासून दक्षिण मुंबई परिसरात जोरदार पावसाची बॅटिंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच कोस्टल रोड परिसरात जोराचं वारं आणि पाऊस सुरु झाला आहे. मध्य आणि हर्बल मार्गावरील अप आणि डाऊन रेल्वेच्या लोकल सेवा दहा मिनिटे उशिरा धावत आहे. ठाणे ते पनवेल ठाणे ते कल्याण आणि ठाणे ते सीएसटी ला जाणाऱ्या लोकल दहा मिनिटांनी उशिराने धावत आहे. अवकाळी पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे.
पुढील 4 ते 5 दिवस मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climet Change) होत आहे. कुठे उन्हाचा तडाखा तर कुठं ढगाळ वातावरण असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच हवामान विभागानं पुढील 4 ते 5 दिवसाचा हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 4 ते 5 दिवस राज्यात तीव्र हवामानाचा इशारा कायम आहे. राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कताही भागात गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबई ठाणे पालघर येथे मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
पालघरच्या पश्चिम किनारपट्टीला वादळी वारा आणि पावसाचा जोरदार तडाखा
दरम्यान, पालघरच्या पश्चिम किनारपट्टीला वादळी वारा आणि पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. वादळी वारा आणि पावसाचा मच्छीमारांना देखील फटका बसला आहे. डहाणू आणि पालघरमधील चाळीस ते पंचेचाळीस बोटींच मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. वादळाच्या तडाख्यात 40 ते 45 बोटी सापडल्या होत्या, त्यांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, या नुकसानीचे जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे सुरु करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:


















