Maharashtra Rain LIVE: मुंबईत तुफान पाऊस, राज्यभरात धुवाधार, नदी नाल्यांना पूर
Mumbai Rain Updates: राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर मुंबई, ठाणे, पुण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे.

Background
Maharashtra Rain Updates: राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर मुंबई, ठाणे, पुण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईतील (Mumbai Rain) अनेक भागात पाणी साचले आहे. गेल्या तासाभरापासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरात सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. किंग्ज सर्कल, वडळा, सायन आणि माटुंगा या परिसरात जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. चुनाभट्टी येथील एका चाळीतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. तर मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकात (Mumbai Local Train) रुळांवरही पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे पुण्यातील (Pune Rain) जनजीवन देखील विस्तळीत झाले आहे. अजित पवार पुण्यातील अनेक भागाची पाहणी करताय. राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
Raigad Rain : रायगड जिल्ह्यात कुठे किती पाऊस?
रायगड जिल्ह्यात दिवसभरातील पावसाची आकडेवारी मिलिमीटर नुसार
अलिबाग - 74
मुरुड - 149
पेण - 120
पनवेल - 214
उरण - 75
कर्जत - 50
खालापूर - 66
माथेरान - 121.2
सुधागड - 34
माणगाव - 43
तळा - 109
महाड - 56
पोलादपूर - 83
श्रीवर्धन - 88
म्हसळा - 132
रोहा - 47
एकूण पाऊस 1461.2 दिवसभरातील एकूण पावसाची सरासरी 91.33mm
खारघरमधील डोंगररांगांत फिरायला गेलेल्या ५ पर्यटकांना रेस्क्यू
नवी मुंबई -
खारघर येथील डोंगररांगांत फिरायला गेलेल्या ५ लोकांना करण्यात आले रेस्क्यू
खारघर गोल्फ कोर्स मागील डोंगरावरील घटना.
सायन कोळीवाडा येथील पाच जण फिरण्यासाठी खारघर येथील डोंगरावर गेले होते. मात्र मुसळधार पावसामुळे धबधब्याचा प्रवाह वाढल्याने तरुण अडकून पडले
खारघर अग्निशमन जवानांनी दोरीच्या साह्याने पाच तरूणांना सुखरूप रेस्क्यू केले आहे.
























