Maharashtra Rain LIVE Updates : रत्नागिरीत 13 ते 17 सप्टेंबर दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
Maharashtra Rain LIVE Updates : राज्यभरात पावसाच्या कोसळधारेचा इशारा. अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचं हवामान विभागाचं आवाहन.
LIVE
Background
Maharashtra Rain LIVE Updates : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी उकाड्यानं अंगाची लाही लाही होत होती. अशातच पुन्हा एकदा वरुणराजानं कृपा करत बरसण्यास सुरुवात केल्यानं अनेक राज्यांत उकाड्यापासून सुटका झाल्याचं पाहायला मिळत आहे.
भारतीय हवामान खात्यानं गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं की, या महिन्याच्या 17 आणि 18 तारखेच्या सुमारास बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओडिशामध्ये अत्यंत मुसळधार पाऊस कोसळू शकतो. त्यासह इतर राज्यांतही हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातही पावसाचा तडाखा
हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीभागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. यामुळे विदर्भात विजांच्या कडकडाटासह तीन दिवस मुसळधार पाऊस तर मराठवाडा भागात आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुण्यात रविवारीच सलग तीन-चार तास पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांचे हाल झाले. सोमवारीही अनेक शहरांमध्ये पावसाने हजेरी लावली.
शिर्डीत मुसळधार पाऊस
शिर्डीसह परिसरात मुसळधार पाऊस बरसत आहे. काल संध्याकाळपासून शिर्डीत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. राहता, कोपरगाव, शिर्डी, बाभलेश्वर परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
बुलढाण्यात पावसाची संततधार
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 36 तासांपासून अनेक भागांत पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झालं असून नदी नाले दुधडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी शेतात पाणी तुंबल्यामुळे शेतकऱ्यांची पिकं ही पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
वर्ध्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार
वर्धा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. ग्रामीण भागांतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिंगणघाट तालुक्यातील कान्होली गावाला पाण्याचा वेढा आहे. 2 ते 3 फूट पुराच्या पाण्यातून नागरिकांना महत्वाच्या कामासाठी वाट काढावी लागत आहे. तर वर्धमनेरी-आर्वी मार्ग बंद झाला आहे. तसेच चानकी-भगवा मार्ग बंद झाला आहे. अनेक शेतात पुन्हा पाणी साचल्याच पाहायला मिळत आहे.
कोणत्या भागात ऑरेंज आणि यलो अलर्ट?
हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरासाठी पुढील पाच दिवस पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसाठी आजपासून पुढील तीन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात पुढील तीन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात पुढील दोन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नांदेड आणि हिंगोलीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं आज मराठावाड्यासाठी देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Ratnagiri Rain : रत्नागिरीत 13 ते 17 सप्टेंबर दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
रत्नागिरीत जिल्ह्यात 13 ते 17 सप्टेंबर या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितेता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केली आहे.
नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस, पिकांना फायदा
नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह पावसाने हजरी लावलीय. या पावसामुळे कापूस पिकासह अनेक पिकांना याचा फायदा होणार आहे.
Ratnagiri Rain : संगमेश्वरमधील गड नदीला पूर, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली
Ratnagiri Rain : रत्नागिरीतील संगमेश्वर येथे सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे संगमेश्वरमधील गड नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी माखजन बाजारपेठेत शिरण्यास सुरवात झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे पुराची तीव्रता वाढण्याची भीती आहे. गड नदी लगत असलेली अनेक हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे
Kolhapur : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान; कोल्हापूर जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाचा जोर
Kolhapur : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा प्रचंड नुकसान केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत असून सोयाबीन, भुईमूग, मुग या पिकाला या पावसाचा फटका बसला आहे. सोयाबीन काढणीला आले असताना शेतामध्ये पाणीच पाणी झाले आहे. आधी बोगस बियाण्यांमुळे सोयाबीनचे पीक घेता आले नाही. तर आता हाता-तोंडाला आलेले पीक परतीच्या पावसाने जमीनदोस्त केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या नुकसानीचे तत्काळ पंचनामे होऊन मदत मिळावी अशी मागणी केली आहे.
Kolhapur : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान; कोल्हापूर जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाचा जोर
Kolhapur : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा प्रचंड नुकसान केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत असून सोयाबीन, भुईमूग, मुग या पिकाला या पावसाचा फटका बसला आहे. सोयाबीन काढणीला आले असताना शेतामध्ये पाणीच पाणी झाले आहे. आधी बोगस बियाण्यांमुळे सोयाबीनचे पीक घेता आले नाही. तर आता हाता-तोंडाला आलेले पीक परतीच्या पावसाने जमीनदोस्त केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या नुकसानीचे तत्काळ पंचनामे होऊन मदत मिळावी अशी मागणी केली आहे.