एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ठरलं! अतिवृष्टीग्रस्तांना अशी मिळणार सरकारी मदत, 'हे' चार घटक महत्वाचे

राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसानीसाठी भरपाई म्हणून 10 हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मदतीचे वाटप 13 मे 2015 च्या शासकीय आदेशानुसार केले जाणार आहे. मंगळवारपर्यंत नुकसानीचा अहवाल जाणार आहे. त्यानंतर मदतीचे वाटप सुरू करण्याचे नियोजन केले जात आहेत.

उस्मानाबाद : राज्यात अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून 10 हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी, 23 ऑक्टोबर रोजी केली.  राज्य सरकारने जाहीर केलेल्या या मदतीचे वाटप 13 मे 2015 च्या शासकीय आदेशानुसार केले जाणार आहे. मंगळवारपर्यंत नुकसानीचा अहवाल जाणार आहे. त्यानंतर मदतीचे वाटप सुरू करण्याचे नियोजन केले जात आहेत.

अतिवृष्टीग्रस्त जिल्हातील पंचनामे अंतिम टप्प्यात आले असून त्याचा अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे. नुकसानग्रस्तांना 13 मे 2015 च्या शासन निर्णयानुसार मदत दिली जाणार आहे. तर शेतीच्या भरपाईसाठी शासनाने आता नवे निकष तयार केले असून त्यानुसार भरपाई मिळेल.

2015 मधील निर्णयानुसार मिळणार अशी भरपाई

दुधाळ जनावरे : 30,000 मेंढी, बकरी, डुक्कर 3,000 उंट, घोडा, बैल : 25,000 वासरू, गाढव, शिंगरू, खोचर : 16,000 कुक्कुटपालन : प्रतिकोंबडी 50 रुपये

सखल भागातील पक्के घर पूर्णतः पडझड : 95,100 दुर्गम भागातील घर पडझड : 1,01,900 व्यक्ती मृत: प्रत्येकी चार लाख वारसांना पक्की घरे 15 टक्के पडझड : 5,200 कच्चे घर 15 टक्के पडझड: 3,200 पडझड तथा नष्ट झोपड्या : 4,100 घराला जोडून असलेला गोठा: 2,100

अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

परतीच्या पावसाने उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, पुणे, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतीला सर्वाधिक फटका बसला. या पावसाने शेतीचं मोठं नुकसान झालं. या अतिवृष्टीमध्ये काही व्यक्तीचा देखील बळी गेला. तर अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. या चार बाबींवर आधारित पंचनामा अहवाल पाठवावा, असे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार आता मंगळवारपर्यंत अहवाल शासनाला सुपूर्द केला जाणार आहे. त्यानंतर मदतीची रक्कम संबंधित जिल्ह्यांना वितरित केली जाणार आहे.

जिल्हास्तरावरुन चार घटकांवर पंचनामे अहवाल शासनाने मारगविल्याने तत्काळ मदत करणे शक्य होणार आहे. पंचनामे अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हानिहाय मदतीची रक्कम निश्चित करुनती काही दिवसांत वितरित केली जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी काय केली होती घोषणा?

10 हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा  करताना सणासुदीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी राहू नये म्हणून दिवाळीपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत दिली जाईल यासाठी प्रयत्न करु, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 10 हजार प्रति हेक्टर मदत देणार आहोत, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं होतं.

रस्ते- पूल - 2635 कोटी नगर विकास - 300 कोटी महावितरण ऊर्जा - 239 कोटी जलसंपदा - 102 कोटी ग्रामीण रस्ते व पाणीपुरवठा - 1000 कोटी कृषी-शेती-घरासाठी - 5500 कोटी

जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर मदत शेती पिकासाठी जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्यात येईल. फळपिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर, मृतांच्या वारसांना, मयत पशुधनासाठी घरपडझडीसाठी भरीव मदत देण्यात येईल, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.  नुकसानग्रस्तांकरता 10 हजार कोटी रुपयांची मदत नम्रपणे जाहीर करत आहोत, कृपाकरुन त्याचा स्वीकार करावा. दिवाळीआधी सगळ्यांपपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं होतं

ठरलं! अतिवृष्टीग्रस्तांना अशी मिळणार सरकारी मदत, 'हे' चार घटक महत्वाचे

केंद्राकडून 38 हजार कोटी रुपये येणं बाकी तसंच एकूण 38 हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून येणं बाकी आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंं होतं. "केंद्राकडे निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसान भरपाईकरता 1065 कोटी रुपयांची मागणी केलेली आहे. किती दिवस झाले सर्वांना माहित आहे. केंद्र सरकारकडून राज्याचे हक्काचे 38 हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. त्याची पत्रे, स्मरणपत्रे देण्यात आलेली आहेत. अतिवृष्टीनंतर केंद्र सरकारकडून पाहणीकरिता  पथक येते, 2 ते 3 वेळा केंद्रास आठवण केली आहे परंतु अद्याप पथक आलं नाही," असं ठाकरे म्हणाले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NCP Ajit Pawar : गुलाबी जॅकेट ते गुलाबी गाडी ; अजित पवारांची थीम यशस्वीMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Embed widget