
Pune News : तरुणाची गाडी पोलिसांनी अडवल्याने युवकाचं अनोखं आंदोलन, चक्क रस्त्यावर झोपून पोलिसांचा निषेध
Pune News : युवकाने चक्क रस्त्यावर झोपून पोलिसांचा निषेध केला आहे. नेमकं घडलं काय?

Pune News : पुण्यातील (Pune) अलका चौकात एका युवकाने पोलिसांच्या विरोधात अनोखं आंदोलन केलं आहे. यासाठी त्याने चक्क रस्त्यावर झोपून पोलिसांचा निषेध केला आहे. नेमकं घडलं काय? जाणून घ्या
"माझी रेल्वे सुटेल, मला जाऊ द्या..".
मिळालेल्या माहितीनुसार, एम पी एस सी (MPSC) करणारा विद्यार्थी हा पुणे रेल्वे स्टेशन दिशेने जात असताना अलका टॉकीज चौकात पोलिसांनी त्याला अडवले आणि गाडीवर असलेल्या तरुणाला दंड भरायला सांगितला. "माझी रेल्वे सुटेल मला जाऊ द्या" असं विद्यार्थ्याने सांगितले, मात्र पोलिसांनी त्याला तिथेच बसवले. वेळ निघून गेल्यामुळे त्याने रस्त्यावर ठिय्या मांडला आणि पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर झोपून आंदोलन केले.
पोलिसांकडून मुद्दाम अडवणूक केल्याचा तरुणाचा दावा
दरम्यान, वाहतूक पोलिसांना सर्व कागदपत्रे दाखवूनही पोलिसांकडून मुद्दाम अडवणूक केल्याचा दावा तरूणाने केला आहे. पुण्यातील अलका चौकात युवकाचे अनोख आंदोलन केलं असून पोलिसांनी गाडी अडवली, मात्र वेळेत सोडलं नसल्याने नुकसान झाल्याचं युवकाने सांगितलं आहे. पोलिसांचा विरोध म्हणून या तरुणाने चक्क रस्त्यावर झोपून निषेध व्यक्त केला आहे.
पोलिसांमुळे गावी जाणारी रेल्वे चुकली
पोलिसांनी अडवल्यामुळे गावी जाणारी रेल्वे चुकली असा आरोप करत गांधीगिरी मार्गाने आंदोलन करताना हा तरुण दिसला. पुण्यातील अलका चौकातील तरुणाला पोलिसांनी खाजगी ट्रॅव्हल बसमध्ये बसवून गावी पाठवण्याची व्यवस्था केली आहे. हा सर्व खर्च पोलिसांकडून देण्यात आला असून तरुणाचा आता कुठलाही आक्षेप नसल्याचं त्याने म्हटलं आहे. तसेच पोलिसांचे या तरुणाने आभार मानले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Pune Rain : पुण्यात तुफान पाऊस, रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, दगडूशेठ मंदिरात शिरलं पाणी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
