एक्स्प्लोर

Kirit Somaiyya : ...म्हणून मुख्यमंत्र्यांनी शंभर गुंड पाठवले होते? सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर आरोप

माझ्यावर हल्ला करणाऱ्या लोकांना अद्यापही अटक का नाही? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या ( Bjp Kirit somaiyya) यांनी ठाकरे सरकारला केला आहे.

पुणे : माझ्यावर हल्ला करणाऱ्या लोकांना अद्यापही अटक का नाही? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या ( Bjp Kirit somaiyya) यांनी ठाकरे सरकारला केला आहे. भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे आज पुणे (Pune) दौऱ्यावर आले आहेत. आज ते पुण्यातील शिवाजी नगर पोलीस स्टेशन (Shivajinagar Police ), पुणे महानगरपालिका आणि संचिती हॉस्पिटल या ठिकाणांना भेट देत आहेत. पुणे पालिकेच्या पायऱ्यांवर भाजप किरीट सोमय्यांचा सत्कार करणार आहे. पुण्यामध्ये पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष होण्याचे चिन्ह दिसून येत आहेत. 

म्हणून मुख्यमंत्र्यांनी शंभर गुंड पाठवले - सोमय्या

कोरोना काळात राज्य सरकारने भ्रष्टाचार केला असून कोवीड सेंटर्सच्या उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी केला. उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या मदतीने लोकांच्या जीवाशी खेळ मांडला असा आरोप सोमय्यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. ज्या कंपनीला उद्धव ठाकरे यांनी ब्लॅक लिस्ट केलं होतं त्या कंपनीला आदित्य ठाकरे यांनी कंत्राट दिलं. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या मदतीने को बीडमध्ये लोकांच्या जीवाशी खेळण्याचा पाप केला आहे. त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. महापालिकेत तक्रार होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी शंभर गुंड पाठवले होते. आता कारवाई कशी करत नाही ते पाहावे लागेल असे सोमय्या म्हणाले., सुट्टीच्या दिवशी पुणे महापालिकेत 100 लोक घुसली कशी? आज एव्हढा पोलीस बंदोबस्त आहे मग त्यादिवशी हे सगळे का पळून गेले होते? ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर अद्याप अटक का झाली नाही? त्या दिवशी आलेली गुंड कुठून आली होती पुण्याची होती की पिंपरी-चिंचवडची होती असा सवाल सोमय्यांनी केलासोमय्या आज पुण्यात असल्यामुळे पुणे महापालिकेत मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पुणे महापालिकेत सत्कारही होणार आहे.

तर संजय राऊत यांच्यावर कारवाई व्हावी

सत्कार महत्वाचा नाही, शिवाजीनगर कोबी सेंटर मध्ये घोटाळा झाला. ज्यात एका पत्रकाराचा मृत्यू झाला त्यांच्यावर कारवाई व्हावी. प्रवीण राऊत सध्या जेलमध्ये आहेत त्यांच्याकडून संजय राऊत यांनी फायदा घेत असेल तर संजय राऊत यांच्यावर कारवाई व्हावी. संजय राऊत यांना वाटत असेल कारवाई होणार नाही तर ते मूर्खाच्या वनात आहेत. माझ्यावर हल्ल्याचा कट हा उद्धव ठाकरे यांनीच घडवला आहे त्याबद्दल शंका असायचं कारण नाही दरम्यान पुणे हल्ल्यानंतर राज्यपालांची भेटल घेतल्यानंतर किरीट सोमय्या म्हणाले होते , 'पुण्यातील घटनेसंदर्भात  राज्यपालांनी चिंता व्यक्त केली.  ते या सगळ्या प्रकरणी राज्य सरकारकडे रिपोर्ट मागवणार आहेत. ते गृहमंत्र्यांशी देखील बोलणार आहेत.' तसेच  हल्ला करणाऱ्या एकूण 64 जण असून या 64 जणांना अटक करावी,  असं किरीट सोमय्या यांनी त्यावेळी म्हटलं होतं.  'मोदी सरकारच्या कमांडोमुळं मी वाचलो, उद्धव ठाकरेंनी कितीही उद्धटपणा केला, संजय राऊतांनी कितीही धमक्या दिल्या तरी मी भ्रष्टाचार बाहेर काढत राहणार', असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.  

हल्लेखोरांना अटक न झाल्यास आंदोलन 
किरीट सोमय्या यांनी सांगितलं,  मी गुरूवारी दिल्लीला जावून गृहसचिवांची भेट घेणार आहे. मी येत्या शुक्रवारी पुण्यात चार वाजता जाणार आहे.  हल्ला करणारे 64 जण होते. ते सगळे व्हिडिओमध्ये दिसत आहेत, त्या सगळ्यांना अटक झाली पाहीजे हल्लेखोरांना अटक न झाल्यास मी पुण्यात आंदोलन करणार. पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता हे राज्य सरकारचे ऐकतात.'
 
दगड फेकणा-यांना पोलीसांची मदत
'हे पूर्वनियोजित असल्याचं दिसतय आणि दगड फेकणा-यांना पोलीस मदत केली आहे', असंही सोमय्या म्हणाले. कोव्हीड सेंटरचे कंत्राट सरकारने दिलेच कसे? सुजीत पाटकरला अटक का नाही? असे प्रश्न देखील यावेळी किरीट सोमय्या यांनी उपस्थित केले. पुढे त्यांनी सांगितलं, 'मोदी सरकारच्या कमांडोमुळं मी वाचलो, उद्धव ठाकरेंनी कितीही उद्धटपणा केला, संजय राऊतांनी कितीही धमक्या दिल्या तरी मी भ्रष्टाचार बाहेर काढत राहणार'

भाजपला 18 खासदार निवडून देणाऱ्या महाराष्ट्राचा अपमान करणं दुर्दैवी : सुप्रिया सुळे

किरीट सोमय्यांना धक्काबुक्की करणारा शिवसैनिक गजाआड

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget