एक्स्प्लोर

MPSC News : मोठी बातमी! MPSC विद्यार्थ्यांची मागणी मान्य, नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार

MPSC News : नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने केली आहे. या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू होते.

MPSC News : MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) मान्य करण्यात आली आहे. नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरू होते. राज्य लोकसेवा आयोगाने हा निर्णय जाहीर केल्यानंतर  विद्यार्थ्यांकडून पुण्यातील झाशीची राणी चौकात जल्लोष साजरा करण्यात आला. 

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने याबाबतचा निर्णय ट्वीट करून जाहीर केला. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत असल्याचे आयोगाने म्हटले. 

 

मागील अनेक वर्षांपासून पुण्यात किंवा राज्यभर विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. दोन वर्ष कोरोना (Corona) असल्याने या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर परीक्षांच्या तारखा देखील लवकर जाहीर झाल्या नाहीत. या सगळ्यांमुळे विद्यार्थी संतापले होते. त्यानंतर नवा पॅटर्न लागू करणार असल्याने विद्यार्थी आक्रमक झाले होते. 

20 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरु 

सोमवारपासून (20 फेब्रुवारी)  पुण्यातील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात  एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु होते. गेल्या दोन महिन्यातील हे तिसरे आंदोलन होते. जानेवारीच्या अखेरीस विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत सरकारनं नव्या परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी पुढे ढकलली होती. मात्र, हा निर्णय घेऊन तीन आठवडे उलटले असूनसुद्धा या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले होते. सरकारने  आश्वासन देऊनही आदेश न काढल्याबद्दल विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला होता. विद्यार्थ्यांनी उपोषण आंदोलन सुरू केले होते. 

शरद पवारांनी घेतली होती आंदोलक विद्यार्थ्यांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी, 21 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा आंदोलनस्थळी जात आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. विद्यार्थ्यांची मागणी योग्य असल्याचे त्यांनी म्हटले होते. आंदोलन स्थळावरून शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती. या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असं सांगत त्यांनी हे आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं होते. 

शरद पवार यांच्या आवाहनानंतर विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र, आंदोलनावर ठाम राहिले. अधिकृत घोषणा होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर आता, राज्य लोकसेवा आयोगाने नवीन अभ्यासक्रमानुसार 2025 पासून परीक्षा घेणार असल्याची घोषणा केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
गडचिरोलीमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Embed widget