(Source: Poll of Polls)
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना दिल्लीला जाऊन काय मिळालं? महाविकास आघाडी फुटणार; थेट दाव्याने राजकीय खळबळ
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यात मात्र महायुतीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर हल्लाबोल सुरूच आहे. सातत्याने त्यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली जात आहे.
Uddhav Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Election) पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तीनदिवसीय दिल्ली दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी करतानाच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यात मात्र महायुतीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर हल्लाबोल सुरूच आहे. सातत्याने त्यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली जात आहे. व्यंगचित्र सुद्धा शेअर करून त्यांच्या दौऱ्याची खिल्ली उडवली जात आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी सुद्धा टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना दिल्लीला जाऊन काय मिळालं? अशी विचारणा केली आहे. महाविकास आघाडी फुटणार असल्याचा दावा सुद्धा शेलार यांनी केला. जेव्हा विधानसभेचे निकाल येथील त्यावेळी महाविकास आघाडी फुटणार असल्याचा दावा शेलार यांनी केला.
चंद्रशेखर बावनकुळेंकडून टीका
शेलार यांनी महाविकास आघाडी फुटणार असल्याचा दावा केला असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या दारात लोटांगण घालून उद्धव ठाकरेंचा बौद्धिक विकास खुंठला असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंनी बांगलादेशचा सल्लागार म्हणून दौरा करावा असा टोलाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. ते म्हणाले की हिंदूविरोधी विचारांच्या दहशतवादी कृत्य करणाऱ्या लोकांना सल्ला देण्यासाठी उद्धव ठाकरे अतिशय उत्कृष्ट सल्लागार आहेत. हल्ली त्यांचा सल्ला हे सगळेच ऐकतात. म्हणून त्यांनी बांगलादेशचा दौरा करावा, फेसबुक लाईव्ह करावे अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.
श्रीकांत शिंदेंचा ठाकरेंना टोला
दरम्यान, शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनीही दिल्ली दौऱ्यावर टीका केली आहे. यापूर्वी सगळे लोक मातोश्रीवर येत होते, पण आज उद्धव ठाकरेंना दिल्लीत येऊन तीन-तीन दिवस बसाव लागत आहे. महाराष्ट्रानं असं चित्र कधी पाहिलं नव्हतं, अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतलेला फोटो टाकायला उद्धव ठाकरे घाबरले असतील. कारण, त्यांच्यासोबत फोटो आला, तर टीका होईल. सोनिया गांधींनी सांगितलं असेल की फोटो टाकायचा नाही असा टोलाही शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या