एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Sharad Pawar Uddhav Thackeray :  मविआत मतभिन्नता; पवारांच्या भेटीसाठी ठाकरे सिल्वर ओकवर, बंद दाराआड सव्वा तास चर्चा

Sharad Pawar Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली.

Sharad Pawar Uddhav Thackeray :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी  पवार यांचे निवास स्थान 'सिल्वर ओक'मध्ये भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली. मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमधील मतभिन्नता समोर आली होती. या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्त्वाची समजली जात आहे. शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray Faction), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) स्वातंत्र्यवीर सावरकर ते ईव्हीएमसारख्या काही मुद्यांवर मतभिन्नता दिसून आली होती. 

शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत उपस्थित होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात विविध मुद्यांवर जवळपास सव्वा तास चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी म्हणून प्रामाणिकपणे लढूया या मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. जे संविधानाच्या विरोधात आहेत त्यांच्या विरोधात आपण लढायचं. त्याशिवाय, राज्यात आणि केंद्रात देखील एकी कायम राहिली पाहिजे या मतावरही दोन्ही पक्ष ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

अदानी यांची संसदेच्या संयुक्त समितीमार्फत चौकशीची घेतलेली भूमिका, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रकरणी घेतलेली भूमिका, याबाबत तिन्ही पक्षात समन्वय साधला गेला नसल्याचे आतापर्यंत निदर्शनास आले होते. आता पुढे असं होऊ नये यासाठी बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

महाविकास आघाडीकडून राज्यभरात आता केंद्र सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात राज्यभरात 'वज्रमुठ' सभेचे आयोजन केले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची पहिली सभा पार पडली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता, पुढील सभा नागपूरमध्ये असणार आहे. मात्र, त्यापूर्वीच महाविकास आघाडीत विविध मुद्यावरून वादाचे फटाके वाजण्यास सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतची भूमिका, अदानींची जेपीसी चौकशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री, ईव्हीएम आदी मुद्यांवर महाविकास आघाडीत मतभिन्नता नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झालीय का अशी चर्चा रंगू लागली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
Sharad Pawar: माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
Rahul Gandhi In Kolhapur : शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
Tomato Price : टोमॅटोची 'लाली' वाढली, बळीराजाला दिलासा, 1 किलो टोमॅटो घेण्यासाठी द्यावे लागतात 'एवढे' पैसे 
टोमॅटोची 'लाली' वाढली, बळीराजाला दिलासा, 1 किलो टोमॅटो घेण्यासाठी द्यावे लागतात 'एवढे' पैसे 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines TOP Headlines 11 AM 06 October 2024Nitin Gadkari Sangli : मुंबई-पुणे-बंगळूर महामार्ग बांधणार, पाच ठिकाणी उतरणार विमानRamRaje Nimbalkar Join NCP | तुतारी हाती घ्यायची का? असं विचारताच कार्यकर्त्यांचा एकच जल्लोषRaj Thackeray Nashik : मनसेच्या 500 पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे देणार कानमंत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
Sharad Pawar: माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
Rahul Gandhi In Kolhapur : शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
Tomato Price : टोमॅटोची 'लाली' वाढली, बळीराजाला दिलासा, 1 किलो टोमॅटो घेण्यासाठी द्यावे लागतात 'एवढे' पैसे 
टोमॅटोची 'लाली' वाढली, बळीराजाला दिलासा, 1 किलो टोमॅटो घेण्यासाठी द्यावे लागतात 'एवढे' पैसे 
Mangal Gochar 2024 : दिवाळीपूर्वीच मंगळाची चाल बदलणार; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
दिवाळीपूर्वीच मंगळाची चाल बदलणार; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
Ahmednagar News : मंदिराच्या परिसरात दारु आणि मांसविक्रीच्या दुकानांवर बंदी घाला, वारकऱ्यांच्या मागणीवर विखे पाटील म्हणाले...
मंदिराच्या परिसरात दारु आणि मांसविक्रीच्या दुकानांवर बंदी घाला, वारकऱ्यांच्या मागणीवर विखे पाटील म्हणाले...
Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
Embed widget