एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maharashtra Politics : बहुमत चाचणीविरोधात शिवसेनेची पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव

Maharashtra MLAs Disqualification : शिवसेनेकडून अपात्रेतची कारवाई करण्यात आलेल्या आमदारांच्या याचिकेवर आजच सुनावणी करावी यासाठी शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

Maharashtra MLAs Disqualification : महाराष्ट्रातील सत्ता नाट्य संपले असले तरी दुसरीकडे कायदेशीर लढाई अद्याप संपली नाही. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यपालांनी दिलेल्या निर्देशानुसार शनिवारी आणि रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांना विश्वासमत सिद्ध करावे लागणार आहे. या दरम्यानच विधानसभा अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईच्या याचिकेवर 11 जुलै रोजी होणारी सुनावणी आजच करावी अशी मागणी शिवसेनेकडून सु्प्रीम कोर्टात करण्यात आली आहे. 

शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्रतेची नोटीस बजावली आहे. या नोटिशीविरोधात काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 11 जुलै रोजी याबाबत पुढील सुनावणी करणार असल्याचे सांगितले. त्याशिवाय, अपात्रतेची नोटिस बजावलेल्या आमदारांना 12 जुलैपर्यंत नोटिशीला उत्तर देण्यास सांगितले होते. सुप्रीम कोर्टात शिवसेनेकडून ज्येष्ठ वकील अॅड. कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत. 

आजच सुनावणीची मागणी का?

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील एक गट आणि भाजप यांनी एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली आहे. राज्यपालांनी या आघाडीला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. या बहुमत चाचणीनंतर विधानसभा अध्यक्षांची निवड होऊ शकते. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय नव्या विधानसभा अध्यक्षांसमोर होऊ शकतो. नव्या अध्यक्षांकडून शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यत आहे. पक्षांतर बंदी कायद्यानुसार, एकनाथ शिंदे यांच्यासह 16  आमदारांवर अपात्रतेची कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या फुटीर गटाला अधिकृत शिवसेनेचा गट म्हणून मान्यता मिळेल. त्यामुळे शिवसेनेसोबत असलेल्या 16 आमदारांसमोर अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. अन्यथा या फुटीरगटासोबत जुळवून घ्यावे लागणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
IND vs PM XI Warm-Up Match : टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tufan Alaya : ...जेव्हा गावातले 17 शेतकरी गट एकत्र येतात !Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणारMaharashtra Oath Ceremony : 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी - सूत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
IND vs PM XI Warm-Up Match : टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
टीम इंडियाच्या तयारीवर पावसाने फेरले पाणी! पहिल्या दिवसाचा खेळ रद्द, BCCIने दिली मोठी अपडेट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात? विविध राज्यांना किती खर्च येणार?
महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात?
Embed widget