'बिचाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला' : प्रकाश आंबेडकर
फडणवीसांच्या उपमुख्यमंत्रीपदावरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar)यांनी बोचरी टीका केली आहे.फडणवीसांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला,असं आंबेडकरांनी म्हटलं आहे
Maharashtra Politics : काल एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीसांच्या उपमुख्यमंत्रीपदावरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी बोचरी टीका केली आहे. बिचारे देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. दिल्लीहून फडणवीस यांना आदेश आले म्हणून ते मुख्यमंत्री झाले म्हणून असं ट्वीट मी केलं आहे. फडणवीस यांचा अपमान करायचा होता म्हणून उपमुख्यमंत्री पद दिलं आहे का हे केंद्रात विचारायला हवं. सरकार वर नियंत्रण ठेवायचे होते तर चंद्रकांत पाटील पण होते, असं देखील ते म्हणाले. ते आज पुण्यात बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 11 जुलै रोजी पीटिशन शिवसेनेकडे गेलं तर आपली नामुष्की होऊ नये म्हणून फडणवीस यांनी शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं असावं. राज्यपालांनी फ्लोर टेस्ट करण्याच्या सूचना दिल्या. सभागृहात कामकाज करुन अध्यक्ष निवडण्याच्या अधिकार दिला नाही. हे सरकार व्हीपचं असेल. कुठल्याही पक्षात व्हीप काढणाऱ्याची नेमणूक होते ती पक्षाच्या अध्यक्षांकडे असते. शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांचाच आहे हे मान्य करावं लागेल. वेगळा गट जो झाला आहे ते ही आज शिवसेना आमची आहे असं म्हणत आहेत. व्हीप जो काढण्यात आला होता त्याला डीफाय करण्यात आलं. माझ्या मते ते अॅन्टी डिफेक्शन लॉ मध्ये बसत आहे असं वाटतं, असं ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 11 जुलै रोजी विश्वास धारक ठराव होईल असं वाटतं. गटनेत्याला कुठलाही अधिकार नसतो. राज्यपालांना ज्यावेळी वाटतं की या सरकारला बहुमत नाही तेव्हा ते विरोधी पक्षाला विचारू शकतात त्यामुळे हे चुकीचे वाटत नाही.
सध्या सुरु असलेल्या वेगवेगळ्या नेत्यांच्या चौकशांसंदर्भात यावेळी त्यांनी म्हटलं की, मी फकीर माणूस आहे, माझ्याकडे कोणी आयकर विभाग, ईडी येत नाही.
नुपूर शर्मा यांना माफी मागायला लावण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर बोलताना ते म्हणाले की, सुप्रीम कोर्ट काही वेळा चांगल्या उद्देशाने दिशा देते. म्हणून त्यांनी नुपूर शर्मा यांना माफी मागावी असं सांगितले असावे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.