एक्स्प्लोर
Maharashtra Politics | त्याला प्रेम दिलं, मोबदल्यात काय मिळालं? : सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअॅप स्टेटस
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. देवेंद्र फडणवीस यांनी आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
मुंबई : राजकारणात काका-पुतण्याचा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड करुन भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. विशेष म्हणजे अजित पवारांच्या या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारही अनभिज्ञ होते. परंतु अजित पवार यांच्या या निर्णयाचा सर्वाधिक दु:ख त्यांची बहिण अर्थात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे झालं आहे. सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून आपल्या भावनांना, नाराजीला वाट मोकळी करुन दिली. 'Party and family Splits म्हणजेच 'पक्ष आणि कुटुंबात फूट' असं त्यांचं आजचं व्हॉट्सअॅप स्टेटस आहे. सोबतच मीडियाशी बोलताना सुप्रिया सुळे अतिशय भावूक झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
आज (23 नोव्हेंबर) सकाळी आठच्या सुमारास महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. देवेंद्र फडणवीस यांनी आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस, भाजपचे काही नेते तसंच अजित पवार राजभवनावर पोहोचले. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
सुप्रिया सुळे कायमच आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसला कुटुंबातील व्यक्तींचे, मित्रपरिवारातील लोकांचे फोटो ठेवतात. परंतु आज अजित पवारांच्या निर्णयानंतर सुप्रिया सुळेंनी ठेवलेली दोन्ही व्हॉट्सअॅप स्टेटस अतिशय बोलकी आहेत. "विश्वास कोणावर ठेवायचा. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी फसवणूक. त्याच्या पाठिशी उभी राहिले. त्याला प्रेम दिलं आणि बघा मोबदल्यात मला काय मिळालं," असंही त्यांचं पुढचं व्हॉट्सअॅप स्टेटस आहे.
अजित पवारांचा निर्णय वैयक्तिक : शरद पवार
अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाला शरद पवारांचा पाठिंबा आहे का?, याबाबत चर्चा सुरु होत्या. शरद पवारांच्या एका ट्वीटनंतर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शरद पवारांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ''अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.''
संबंधित बातम्याअजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 23, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement