(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस सरकारसाठी आज कसोटीचा दिवस; बहुमत चाचणी होणार, काय असेल रणनीती?
Maharashtra Politics : शिवसेनेला दोन मोठे धक्के बसले असून शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे तर पक्ष प्रतोदपदी त्यांच्या गटाच्या भरत गोगावले यांची निवड कायम ठेवण्यात आली आहे
Maharashtra Politics : आज शिंदे-फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करायचं आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय. पण आज त्यांची खरी कसोटी लागणार आहे. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु होणार आहे. आवाजी मतदानानं बहुमत चाचणी होणार आहे.
शिंदे-फडणवीस सरकारची आज कसोटी
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आज परीक्षा आहे. आज सकाळी विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. दरम्यान, शिवसेनेला दोन मोठे धक्के बसले असून शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे तर पक्ष प्रतोदपदी त्यांच्या गटाच्या भरत गोगावले यांची निवड कायम ठेवण्यात आली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत 50 आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांना उद्या बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. दरम्यान, काल झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली असून एकनाथ शिंदे यांनी पहिली लढाईत तर जिंकली आहे. आता उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या वेळी त्यांची खरी परीक्षा आहे.
आमदारांना मार्गदर्शन
आज होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी भाजप शिंदे यांच्याकडून आपापल्या आमदारांना मार्गदर्शन करण्यात आलं असून आजसाठी रणनीती ठरवण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत दिली आहे. शिवसेना आणि भाजप सरकारकडे बहुमत असले तरी प्रत्यक्ष मतदानावेळी काय होईल हे सांगता येत नाही यासाठी खबरदारी घेतली जात आहे. बहुमत असले तरी आपल्याकडील सर्व आमदारांना आपल्या बाजूने मत करण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान शिवसेनेने आमदारांनी व्हीप न पाळल्यामुळे विधानसभा अध्यक्षांना 39 आमदारांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या उद्या दुसऱ्या दिवशी शिवसेना-भाजप युती सरकारला बहुमताच्या चाचणीला सामोरे जायचे आहे. यावेळी नक्की सरकारची रणनीती काय असेल यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. pic.twitter.com/qz4xSxqWgz
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 3, 2022
शिवसेनेला धक्का, गटनेतेपदी एकनाथ शिंदे कायम
विधानसभा अध्यक्षपदी भाजपच्या राहुल नार्वेकरांची निवड झाल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेच शिवसेनेचे गटनेते असतील असं पत्र विधिमंडळ सचिवालयानं दिलं असून शिवसेनेच्या भरत गोगावले यांची निवड रद्द करण्यात आली आहे. तसेच सुनिल प्रभू यांना शिवसेनेने प्रतोदपदी नियुक्ती केली होती, तीदेखील रद्द करण्यात आली. त्या ठिकाणी शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला हा मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जातंय.
दरम्यान, शिवसेनेच्या वतीने अजय चौधरी यांची गटनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती आता रद्द करण्यात आली आहे. तसा आशयाचं एक पत्र विधानमंडळ सचिवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटनेतेपदी कायम ठेवण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: