एक्स्प्लोर

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात अयोध्या कनेक्शन काय?

Maharashtra Politics : शिंदे गट आणि ठाकरे गट असे शिवसेना दोन गटामध्ये विभागली गेली आहे. दोन्ही नेत्यांचं राजकारण हिंदुत्वावर आहे. खरा हिंदुत्ववादी कोण आहे?

Maharashtra Politics : नोव्हेंबरमध्ये अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शिवसेनेतून फारकत घेतल्यानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील राजकारणातील स्वत:चे अस्तित्व आणखी भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शिंदे गट आणि ठाकरे गट असे शिवसेना दोन गटामध्ये विभागली गेली आहे. दोन्ही नेत्यांचं राजकारण हिंदुत्वावर आहे. खरा हिंदुत्ववादी कोण आहे? यावरुन मागील काही दिवसांपासून नेहमीच दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत होत आहेत. एकनाथ शिंदेंचा हा अयोध्या दौरा त्याचाच एक भाग आहे, या दौऱ्यातून  शिंदे आपली हिंदुत्ववादी प्रतिमा आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न करतील. 

मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा असेल. शिवसेनेतून बंडखोरी करण्याआधी काही दिवस आदित्य ठाकरेंसोबत एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाताना मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर निघालेल्या आमदारांनाही सोबत घेऊन जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कारण, शिंदे यांचा हा अयोध्या दौरा राजकीय रणनितीचा एक भाग असल्याचं म्हटलेय जातेय. 

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसोबत जूनमध्ये बंड केलं होतं. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन गटांमध्ये शिवसेना विभागली गेली. दोन्ही नेत्यांकडून स्वत: ला हिंदुत्ववादी दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय.  एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेपासून बंडखोरी केल्यानंतर अनेक कारणं सांगितलं. त्यापैकीच एक कारण उद्धव ठाकरे हिंदुत्ववादापासून दुरावले आहेत, हे एक आहे. 2019 मध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या पक्षासोबत युती केली. तसेच भाजपसोबतची युती तोडली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मागील तीन दशकांपासून शिवसेना आणि भाजप एकत्र होते. आता एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जात आपली शिवसेनेचा खरी हिंदुत्ववादी असल्याचं दाखवतील, यात शंकाच नाही.  

शिवसेना पक्षाची ओळख कट्टर हिंदुत्ववादी पक्ष अशीच आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट म्हटले जाते. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी तडजोड केल्याचं एकनाथ शिंदेंकडून वारंवार भासवलं जात आहे. उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारस असतील, पण आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार असल्याचं शिंदेंकडून वारंवार सांगण्यात येत आहे. 2019 च्या आधी हिंदुत्ववादावरुन उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला होता. भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह अयोध्या दौराही केला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत असतानाही आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. हिंदुत्ववादी प्रतिमा कायम असल्याचं सांगण्यासाठी अदित्य ठाकरेंचा हा दौरा होता. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या अयोध्या दौऱ्याशिवाय मुंबईतील भाषणातही अयोध्याचा उल्लेख  करण्यात आला आहे. जून 2022 मध्ये एका भाषणादरम्यान भाजपचे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, 1992 मध्ये अयोध्यामधील बाबरी मस्जिद पाडताना उपस्थित होते. फडणवीस यांच्या या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होतं.  

अयोध्या दौऱ्यावर जाण्याची तयारी आणि इच्छा मनसे प्रमुख राज ठाकरे यांचाही आहे. कारण मागील काही दिवसांपासून राज ठाकरेंचं राजकारणही हिंदुत्ववादावर चाललं आहे. मराठी मुद्द्यावरुन राजकारण प्रवेश करणाऱ्या राज ठाकरेंनी 2020 मध्ये हिंदुत्वचा मुद्दा घेतला. पक्षाचा झेंडाही त्यांनी भगवा केला. यावेळी बोलताना हिंदुत्व आपल्या डीएनएमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. राज ठाकरेंना हिंदू जननायक असे म्हटले जाऊ लागलेय. राज ठाकरे यांनी भोंग्यावरुनही आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्याचवेळी लवकरच अयोध्याला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितलं होतं. त्यावेळी उत्तर प्रदेशचे भाजप खासदार  बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. जोपर्यंत मुंबईतील उत्तर भारतीयांची राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना अयोध्यात पाऊल ठेवू देणार नाही, अशी भूमिका  बृजभूषण शरण सिंह यांनी घेतली होतील.  बृजभूषण शरण सिंह यांच्या भूमिकेमुळे राज ठाकेंना अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता. 

1989 मध्ये दोन खासदार असणाऱ्या भाजपनं अयोध्यामधील राम जन्मभूमिचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरुनच त्यांनी आपलं राजकारण पुढे चालू ठेवलं. सध्या भाजपचे 303 खासदार आहे. अयोध्यावरुन राजकारण करणाऱ्या पक्षात आता फक्त भाजप हा एकमेव पक्ष राहिलेला नाही. मुंबईपासून अयोध्या 1500 किमी दूर आहे तरीही मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अयोध्या आणि प्रभू श्रीराम या नावांचीच चर्चा आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget