Uddhav Thackeray : दादा कुठे नाराज, दादा तर नाराजांच्या उरावर जाऊन बसले, ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल
अजित पवारांची (Ajit Pawar) नाराजी दूर झाली की नाही माहीत नाही ? त्यांची नाराजी मी बघितली नसल्याचे वक्तव्य ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं.
Uddhav Thackeray : अजित पवारांची (Ajit Pawar) नाराजी दूर झाली की नाही माहीत नाही ? त्यांची नाराजी मी बघितली नसल्याचे वक्तव्य ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलं. अजित पवार चांगले काम करत होते. ते आमच्यासोबत आहेत म्हणून, ज्यांची पोटदुखी होती त्यांच्या उरावर अजितदादा बसले आहेत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा नांदेड, नागपूरला गेले नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हच तर जातच नाहीत. खुलेआम भ्रष्टाचार सुरु आहे. औषध खरेदी कुठल्याही निविदा प्रक्रिया विना सुरु आहे. जर असा व्यवहार होत असेल तर चौकशी कशी करणार असेही उद्धव ठाकरे म्हणाले. रुग्णालयात जर एवढे मृत्यू होत असतील तर आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
दसरा मेळाव्यात विस्ताराने बोलेन
मी दसरा मेळाव्यात विस्ताराने बोलेन. मी अस्वस्थ आहे, आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत. हे बघून संताप येत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कोरोनाचे संकट होतं तेव्हा महाविकास आघाडीचा सरकार होतं. आताही आरोग्य यंत्रणा तिच आहे. या आरोग्य यंत्रणेने कोरोनाचा सामना केला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसैनिकांनो सरकारी रुग्णालयात जा, वस्तुस्थिती पाहा
हे सरकार नपुसक असल्याचं कोर्टानं सुद्धा म्हटलंय. मी शिवसैनिकांना सांगतोय आपल्या सरकारी रुग्णलयात जा. तिथे वस्तुस्थिती काय आहे, डीन अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन समजून घ्या. हा कारभार माणुसकीला सोडून चालू असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. सलग सुट्या येतात तेव्हा डॉक्टरांच्या ड्युटी लावण्यात येतात. त्या कश्या लावण्यात आल्या ते बघावं लागेल. मनुष्यबळ कमी होते ते आम्ही जेव्हा होतो तेव्हा सुद्धा कमी होते. मनुष्यबळाचं कारण देतात ते कोरोना काळात सुद्धा होतं. हे भ्रष्टाचाराचा कारण असल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली. कोर्टाने राज्य सरकारला काहीतरी निर्देश द्यावेत त्यांना खडसावले पाहिजे. कोणतीही साथ नसताना मनुष्यबळ कसे कमी पडते असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
आमचं सरकार गद्दारी करुन पाडलं
डॉक्टरांच्या बद्दलयासाठी पदासाठी रेट कार्ड ठरले आहे. गणपतीत नागपूर बुडले, तेव्हा मुख्यमंत्री बॉलिवूडसोबत फोटो काढत होते. नागपूरच्या जनतेकडे गणपती बसले नव्हते. सध्या नेते पालकमंत्री पदासाठी मंत्री पदासाठी भांडण करत असल्याचे उद्धव टाकरे म्हणाले. आमचं सरकार गद्दारी करुन पाडल्यामुळं टास्क फोर्सचे आभार मानता आले नाही. त्यानंतर या सरकारनं नवे टास्क फोर्स नेमले. ते टास्क फोर्स करताय काय ? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
महत्त्वाच्या बातम्या: