Sharad Pawar : ... तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? वाचा नेमकं काय म्हणाले शरद पवार
Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Sharad Pawar on Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या शपथविधीनंतर राष्ट्रपती राजवट उठली. जर राष्ट्रपती राजवट उठली (President rule) नसती तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाले असते का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपस्थित केला. ते चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. तुम्हाला पहाटेच्या शपथविधीबाबत माहीत होते का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी शरद पवारांना विचारला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, असं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? असेही पवार म्हणाले.
चिंचवडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी शरद पवार चिंचवडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. त्यावेळी सरकार बदलायचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्याचा एक फायदा झाला, तो म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली, असे पवार म्हणाले. काही गोष्टी सांगणं उचित नसतं, पण राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? असे पवार म्हणाले.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शंका
केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेनसंदर्भात दिलेल्या निर्णयावरही पवारांनी भाष्य केलं. राजकारणात मतभेद असतात, संघर्ष होतो. मात्र सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेणं असं कधीच झालं नाही. मी देखील काँग्रेसमधून बाहेर पडलो. मात्र मी असं काही केलं नसल्याचे शरद पवार म्हणाले. निवडणूक आयोगाने आम्हाला सुचवलं मग त्यांनी हात आणि आम्ही घड्याळ घेतलं. पण इथं वैशिष्ट्य निवडणूक आयोगाचे आहे की, पक्षाचे नाव आणि चिन्ह देऊन टाकलं. देशाच्या इतिहासात असं कधीच घडलं नसल्याचे शरद पवार म्हणाले. निवडणूक आयोगाचे निर्णय नेमकं कोण घेतंय याची शंका आहे. आयोग कोणाच्या सांगण्यावरुन बोलतोय असा प्रश्न देखील निर्माण होत असल्याचे शरद पवार म्हणाले. यामागे कोणती तरी शक्ती आणि त्यांचं मार्गदर्शन असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, अशावेळी ज्या पक्षावर अन्याय झाला त्याच्या बाजूने जनता जाते. सध्या मी राज्यात फिरतोय, त्यातून जनता उद्धव ठाकरेंच्या बाजूने हे दिसतंय. याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसतील असेही शरद पवार म्हणाले. जे झालं ते चुकीचं झालं असल्याचे पवार म्हणाले.
राज्यपाल गेले, मी अतीशय संतुष्ट
न्यायालयावर आमचा विश्वास आहे. त्यामुळं सध्या मी न्यायालयाच्या कामकाजावर भाष्य करू शकत नसल्याचे शरद पवार म्हणाले. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या संदर्भातही शरद पवार यांनी वक्तव्य केलं. ते इथून गेले यातच मी अतीशय संतुष्ट आहे. आता दुसरा शब्द वापरता आला असता, मी त्याच्या खोलात जात नाही. प्रत्येक राज्यपालांनी पदाची गरिमा वाढवली. पण भगतसिंह कोशारी यांनी पदाची गरिमा खालावण्यात हातभार लावल्याचे पवार म्हणाले.
इथं काहीही झालं की एका व्यक्तीचं नाव पुढं येतं
मी गिरीश बापट यांना भेटायला गेलो होतो. पण 10 मिनिटे थांबलो. कारण त्याचाही त्यांच्यावर ताण पडेल म्हणून आम्ही बाहेर पडलो. आता भाजपचे धोरण वेगळं असेल, म्हणून त्यांनी प्रचारात बोलावलं असेल असं शरद पवार म्हणाले. महाराष्ट्राचे एक वैशिष्ट्य आहे, इथं काहीही झालं की एका व्यक्तीचं नाव पुढं येतं, मग एखादा भूकंप झालं की तिथं ही याच व्यक्तीचं नाव येतं असेही शरद पवार म्हणाले. पहाटेच्या शपथविधी संदर्भातील माहिती शरद पवार यांना होती असे वक्तव्य उपमुख्यमंत्री शरद पवार यांनी केलं होतं. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर पवारांनी प्रत्युत्तर दिलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :