तुम्हाला डोकं असतं तर एवढे लोक सोडून गेले असते का? मंत्री महाजनांचा राऊतांवर हल्लाबोल
Girish Mahajan on Sanjay Raut : तुम्हाला डोकं असतं तर एवढे लोक सोडून गेले असते का? असा सवाल करत मंत्री गिरीश महाजान (Girish Mahajan) यांनी खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांच्यावर हल्लाबोल केला.
Girish Mahajan on Sanjay Raut : तुम्हाला डोकं असतं तर एवढे लोक सोडून गेले असते का? असा सवाल करत मंत्री गिरीश महाजान (Girish Mahajan) यांनी खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांच्यावर हल्लाबोल केला. बडबड पोपटपंचीमुळं सगळं झालं आहे. त्यांच्याकडून अजून काय अपेक्षा आहे असंही महाजन म्हणाले. देशामध्ये सर्व मतदारांनी मोदीजींना भाजपला आणि मित्र पक्षाला कौल दिला आहे. तुमचे काय राहिले ते बघा 10-12 आमदार राहिले नाहीत, तुम्ही आमच्यावर काय टीका करता असा टोला देखील महाजन यांनी
तीन मोठे पक्ष असताना पालकमंत्रीपदाबाबत मागणी असणं चुकीचं नाही
पालकमंत्रीपदाच्या मुद्यावर देखील गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. दोन ठिकाणी म्हणजे रायगड आणि नाशिकमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागणी आहे. बाकी ठिकाणी सर्व व्यवस्थित आहे असं महाजन म्हणाले. तीन मोठे पक्ष असताना मागणी असणं चुकीचं नाही असं मला वाटतं असे महाजन म्हणाले. मुख्यमंत्री दावोसवरुन आलेत ते आणि शिंदे साहेब, अजित पवारसाहेब बसून निर्णय घेतील असेही महाजन म्हणाले. तिन्ही नेते सक्षम आहेत, त्याबाबतीत निर्णय घेतील. आमचं सरकार आणि आम्हीच रस्त्यावर उतरायचं हे कळलं नाही असेही महाजन म्हणाले.
नाशिकमध्ये भाजपचा पालकमंत्री असणे ही मागणी गैर नाही
नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. याठिकाणी भाजपचा पालकमंत्री असणे ही मागणी गैर नाही असंही महाजन म्हणाले. आमदार नरहरी झिरवळ यांच्या वक्तव्यावर देखील महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. असा कोणता जिल्हा गरीब आहे श्रीमंत आहे असं समजण्याचा अजिबात कारण नाही. ते सीनियर आहेत त्यांनी असं बोलू नये असे महाजन म्हणाले. कोणताही जिल्हा गरीब श्रीमंत नाही, काहीतरी बोलून आसंतोष निर्माण करु नये. झिरवाळ साहेब हुशार आहेत त्यांनी असं बोलू नये असे महाजन म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर काय म्हणाले गिरीश महाजन?
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात बोलताना महाजन म्हणाले की, त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री सक्षम आहेत. एकनाथ शिंदे अजित पवार आहेत. याबाबतीत मी काही बोलणार नाही. मी त्यांना बऱ्याच वेळा बोलण्याचा प्रयत्न केला, समजवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची मागणी तीच आहे. कॅबिनेटमध्ये येईल त्यावेळेस हा निर्णय होईल असे महाजन म्हणाले.