एक्स्प्लोर

'शिंदे मुख्यमंत्री झाले अन् नवस पूर्ण झाला, नवस फेडण्यासाठी शिंदे गट गुवाहाटीला'; शिंदे गटातील आमदारांनीच सांगितलं....

आधीच ज्योतिषाला हात दाखवल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका होत असताना पुन्हा एकदा देव दर्शनाला मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदार जात असल्यानं हा गुवाहाटी दौरा देखील वादग्रस्त होण्याची चिन्हं दिसत आहेत. 

CM Eknath Shinde Group Guwahati : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा (CM Eknath Shinde) गुवाहाटीला जाण्याचा दौरा निश्चित झाला असून कामाख्या देवीचे दर्शन (Kamakhya Devi Darshan) आणि आसामचे मुख्यमंत्री यांच्याशी भेट असे दोन मुख्य कार्यक्रम त्यात असणार आहेत. या दौऱ्यासाठी काही महिने आधीपासूनच तयारी सुरू करण्यात आली होती.  आधीच ज्योतिषाला हात दाखवल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका होत असताना पुन्हा एकदा देव दर्शनाला मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्री आमदार आणि खासदार जात असल्यानं हा गुवाहाटी दौरा देखील वादग्रस्त होण्याची चिन्हं दिसत आहेत. 

नवस फेडण्यासाठी आम्ही गुवाहाटीला जातोय - आमदार किशोर पाटील

एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे आमदार हे गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे, असा नवस कामाख्या देवीला आम्ही केला होता. हा नवस पूर्ण झाल्याने हा नवस फेडण्यासाठी आम्ही 50 आमदार आणि बारा - तेरा खासदार कामाख्या देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी गुवाहाटीला जात असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी म्हटलं आहे.

 देवीचे आभार मानण्यासाठी पुन्हा गुवाहाटीला- शहाजीबापू पाटील 
आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahaji Bapu Patil) म्हणाले की, देवीला नवस तसा प्रत्येकाने केलाच असणार. पण सगळ्यांनी तो मनात मागितला होता. आता देवीने राज्यात शिंदे सरकार आणल्याने राज्याचे प्रश्न झपाट्याने सुटू लागले असून देवीचे आभार मानण्यासाठी पुन्हा गुवाहाटीला जात आहोत, असे शहाजीबापू यांनी सांगितले. आता काय डोंगर काय झाडी होणार नाही, आता काय शिंदे फडणवीस सरकार, काय त्याचा कारभार आणि काय महाराष्ट्र, सगळं एकदम ओके असणार असल्याचा डायलॉगही त्यांनी मारला. 

तीन महिन्यापूर्वी शिवसेना पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे आपल्या सोबत असलेल्या सर्व आमदारांना घेऊन आधी सुरतला आणि तिथून गुवाहाटी येथे मुक्कामी होते. गुवाहाटी येथे सर्वाधिक काळ त्यांचा मुक्काम होता. या काळात त्यांनी भारतातील एक प्रसिद्ध देवस्थान असलेल्या कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन तिथे विशेष पूजा केली होती. आमचे प्रयत्न सफल होऊ देत असे साकडे देखील कामाख्या देवीला घालण्यात आले होते. त्यामुळेच मुख्यमंत्री बनल्यानंतर आता पुन्हा एकनाथ शिंदे हे त्याच देवीच्या दर्शनाला जात आहेत. 

ही बातमी देखील वाचा

काय म्हणता? आता खुद्द मंत्री गुलाबराव पाटीलच म्हणाले, आमचे 40 रेडे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जाताहेत...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Embed widget