Vijay Wadettiwar : 'जरांगेंना असं बोलायला लावणं, हे पाप कुणाचं आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही' वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा
Vijay Wadettiwar : ज्या पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल जरांगे बोलत आहेत, त्यांनी अशी भाषा वापरू नये, असा सल्लाही वडेट्टीवारांनी मनोज जरांगेंना यावेळी दिलाय.
![Vijay Wadettiwar : 'जरांगेंना असं बोलायला लावणं, हे पाप कुणाचं आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही' वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा Maharashtra Political marathi news Vijay Wadettiwar on manoj jarange press conference maharashtra budget session Vijay Wadettiwar : 'जरांगेंना असं बोलायला लावणं, हे पाप कुणाचं आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही' वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/23/f17ea26b269ad9f1c3b6cea6af613f4c1708682211861737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vijay Wadettiwar : मराठा समाजाला ओबीसीमधून (OBC) आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. जरांगे हे भाजप नेते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय. ते म्हणाले, मनोज जरांगे यांना असे बोलायला लावणं हे पाप कुणाचे आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही, मात्र ज्या पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल जरांगे बोलत आहेत, त्यांनी अशी भाषा वापरू नये असा सल्लाही वडेट्टीवारांनी मनोज जरांगेंना यावेळी दिलाय.
विश्वास कुणावर ठेवायचा, अशी माणसे फोडून अनेक बंड झालेत - वडेट्टीवार
मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत बोलताना, ही काही मॅच फिक्सिंग आहे का? जरांगे पाटील यांनी एक पाउल पुढे टाकले ते पुढे असावे. तसेच ज्या पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल ते बोलत आहेत त्यांनी अशी भाषा वापरू नये. सत्ताधारी आणि जरांगे यांच्यामध्ये काय चर्चा झाली हा त्यांच्यातला प्रश्न आहे. तर जरांगे यांना असे बोलायला लावणं हे पाप कुणाचे आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. चर्चेसाठी भाजपचेच लोक जात होते. तुम्ही जे पेराल ते उगवते. विश्वास कुणावर ठेवायचा, अशी माणसे फोडून अनेक बंड झालेत, असं वडेट्टीवारांनी म्हटलंय.
"विरोधकांचा प्रस्ताव येईल, तेव्हा आम्ही चिंधड्या उडवू"
आजपासून राज्य विधी मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. यावर वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, हे अधिवेशन अंतरिम अधिवेशन आहे. प्रश्न उत्तर नाहीत तर लक्षवेधी तरी ठेवा, उद्या आम्ही स्थगन मांडू. विरोधकांचा प्रस्ताव येईल तेव्हा आम्ही चिंधड्या उडवू. सर्व पाप तुम्ही करायचे आणि आरोप मात्र विरोधकांवर करत टीका करायची असं ते म्हणालेत.
"आमचा दम बघायला गेला तर..."
यापूर्वी, 'मनोज जरांगे यांच्या शब्दात दम राहिला नाही, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं, यावर जरांगेंनी देखील जोरदार टीका केली होती. ते म्हणाले होते, "तू काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता नाही. नीट बोलायला पाहिजे, नाहीतर परत म्हणतो ऐकेरी बोलतो म्हणून. आमचा दम कशाला बघतो, आमचा दम बघायला गेला तर तुला शौचालयला देखील जागा सापडणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले होते.
हेही वाचा>>>
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील आंबड तालुक्यात संचारबंदी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)