Sanjay Raut : राजधानी काय भाजपच्या मालकीची आहे का? शेतकरी आंदोलनावरून संजय राऊतचा पंतप्रधानांवर निशाणा
Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले, "मोदींच्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न मांडता येत नाहीत, देशाच्या राजधानीत जाता येत नाही, मुंबईत येता येत नाही ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे"
Sanjay Raut : शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल ही पंतप्रधान मोदींची (PM Modi) गॅरंटी होती, पण दहा वर्षानंतर सुद्धा एकही गॅरंटी शेतकऱ्यांच्या बाबतीत पूर्ण झालेली नाही. उलट शेतकऱ्यांवर तीन काळे कायदे लादण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलाय. शेतकरी आंदोलनाबाबत मोदी सरकारची भूमिका, तसेच इतर विविध मुद्द्यांवरून त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेत.
शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारच्या भूमिकेवर संजय राऊतचा निशाणा
दहा वर्ष नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत, 2014-2019 या दोन्ही वेळेला नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की शेतकऱ्यांच्या हमीभावासंदर्भात निर्णय घेऊ, त्यांना त्यांच्या मालाचा हमीभाव देऊ ही मोदींची गॅरंटी होती, शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल ही मोदींची गॅरंटी होती पण दहा वर्षानंतर सुद्धा एकही गॅरंटी शेतकऱ्यांच्या बाबतीत पूर्ण झालेली नाही. उलट शेतकऱ्यांवर तीन काळे कायदे लादण्याचा प्रयत्न झाला, शेतकऱ्यांच्या जमिनी कॉन्ट्रॅक्ट फार्मरच्या माध्यमातून भाजपला देणग्या देणारे बड्या उद्योगपतींच्या कशात घालण्याचा प्रयत्न झाला
शेतकरी न्याय मागण्यासाठी जेव्हा पुढे आले तेव्हा त्यांच्या अंगावर अश्रूदराच्या नळकांड्या आणि गोळ्या चालवण्यात आल्या ही मोदींची गॅरंटी आहे
"शेतकऱ्यांच्या देशाच्या राजधानीत जाता येत नाही"
संजय राऊत म्हणाले, नरेश टिकेत यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आंदोलन झालं. 2020 साली तेव्हा 720 साली शेतकऱ्यांना मृत्यू पत्करावा लागला, कालच्या आंदोलनामध्ये चार शेतकरी मृत्यू पावले, आता उद्याच्या आंदोलनामध्ये तेव्हा तुम्ही त्यांच्यावर रणगाडे चालवणार का? राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांना येऊ दिल जात नाही. राजधानी काय भाजपच्या मालकीची आहे का? दिल्लीमध्ये ब्रिटिशांचाही दरबार भरत होता आणि शेतकरी ब्रिटिशांच्या दरबारातही आपली मागणी मांडत होते, पण मोदींच्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न मांडता येत नाहीत, देशाच्या राजधानीत जाता येत नाही, मुंबईत येता येत नाही ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे, म्हणून आज सर्व मिळून आम्ही आज शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी चर्चा करू. मोदी चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आले होते. यवतमाळ वाशिम मध्ये शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या झाल्या आहेत. मोदींनी असे पाच प्रकल्प दाखवले पाहिजे जे मोदींनी केले आहेत, मोदींनी दहा वर्षाचे जी उद्घाटन केली आहेत ते प्रकल्प 2014 च्या आधीचे आहेत, मोदी आणि त्यांचे सरकार नेहमीच खोटं बोलत आलं आहे, आता दोन-तीन महिने राहिले आहेत खोटे बोलण्याची जी नशा आहे ती करून घ्या असं राऊत म्हणालेत
आमचा आणि प्रकाश आंबेडकरांचा उत्तम संवाद सुरू - राऊत
प्रकाश आंबेडकर यांच्या बाबत राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय नेते आहेत, आमचा आणि त्यांचा उत्तम संवाद सुरू आहे, प्रत्येकाला त्यांचा पक्ष वाढावा, त्यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात आम्हीही करतो तेही करतात, आमच्यामध्ये हुकूमशाही विरोधात लढण्यात कोणताही मतभेद नाही, भाजप पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा त्यांनी निर्माण केलेलं, संविधान हे पायदळी तुडवण्याचं काम सुरु केलं आहे, संविधान तुडवणाऱ्याचे पाय खेचून त्यांना खाली पाडण्याची आंबेडकरांची भूमिका आहे. त्यासाठी एकीच्या वज्रमुठी ची आवश्यकता आहे, मला खात्री आहे प्रकाश आंबेडकर हे राष्ट्रीय प्रवाहात असल्यामुळे ते पूर्णपणे देशाच्या जन माणसाचा अंदाज घेऊन इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्या सोबत राहतील असं राऊत म्हणाले
"महाराष्ट्रातून नितीन गडकरींचं नाव पहिल्या यादीत न येणं हा त्यांचा अपमान"
राऊत पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची यादी जाहीर झाली, त्याबाबत राऊत म्हणाले, कृपाशंकर सिंग यांचं नाव येऊ शकतं, पवन सिंग यांचं नाव येऊ शकतो. मात्र महाराष्ट्रातून नितीन गडकरी यांचं नाव पहिल्या यादीत न येणं हा त्यांचा अपमान आहे. महाराष्ट्राचा अपमान आहे, ते खूपच स्पष्ट वक्ता आहेत, खूपच प्रामाणिक नेते आहेत आम्हा सर्वांना वाईट वाटलं की त्यांचं नाव नाही असं ते म्हणाले