Shivsena : सरकार पाडण्यासाठी 3 हजार कोटी एकनाथ शिंदेनी आणले कुठून? शिवसेना आमदारांचा सवाल
Shivsena : पाठीत सुरा खुपसणाऱ्या भाजपला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय
Shivsena : महाविकास आघाडीचे सरकार उत्तम काम करत असताना सरकार पाडण्यासाठी यांनी 3 हजार कोटी रुपये लावले ते आणले कुठून? असा सवाल परभणीचे शिवसेना आमदार डॉ राहुल पाटील यांनी विचारला आहे. शिवाय पाठीत सुरा खुपसणाऱ्या भाजपला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय
ही बंडखोरी करण्यासाठी 3 हजार कोटींचा खर्च
मुंबईत घडलेल्या घडामोडी नंतर डॉ राहुल पाटील काल परभणीत दाखल झाले, यावेळी त्यांचा शिवसेनिकांनी सत्कार केला. शिवसेनेचे आमदार मोठ्या प्रमाणावर बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. मात्र परभणीचे सेना आमदार डॉ राहुल पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिले. या सर्व घडामोडी नंतर काल ते परभणीत आले असता त्यांच्या निवासस्थानी शिवसेनिकांनी त्यांच्या सत्कारा साठी मोठी गर्दी केली होती. यावेंळी बोलताना त्यांनी ही बंडखोरी करण्यासाठी 3 हजार कोटी खर्च केला हे 3 हजार कोटी आले कुठून? असा सवाल करत ज्या भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देत कुणी कितीही काही केलं, तरी मुंबईत महापालिकेवर शिवसेनेचीच सत्ता आम्ही आणू असा विश्वास ही व्यक्त केलाय.
बंडखोर आमदार 11 दिवसानंतर मुंबईत परतले
दरम्यान, शिवसेनेतले सर्व बंडखोर आमदार काल 11 दिवसानंतर मुंबईत परतले. आमदारांना आणण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोव्याला गेले होते. मुंबईत 8 वाजता आमदारांना गोव्याहून एक स्पेशल विमान मुंबई विमानतळावर घेऊन आलं. त्यावेळी त्यांनी एका वाक्यात ही प्रतिक्रिया दिली. विमानतळावरील बसमधून आमदारांना ताज प्रेसिडन्ट हॉटेलमध्ये आणण्यात आलं. यावेळी 50 आमदारांसाठी विमानतळ ते ताज प्रेसिडन्ट हॉटेल हा 30 किमीचा रस्ता पूर्ण मोकळा करण्यात आला होता. मोठ्या संख्येनं पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर होता. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना रस्त्यावर उतरु नये असं आवाहन केल्यानं एकही शिवसैनिक रस्त्यावर उतरला नव्हता. एकाही शिवसैनिकानं आमदारांच्या मार्गात येऊ नये अशा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या. त्यानुसार रस्त्यावर शिवसैनिक पाहायला मिळाला नाही. पोलिसांच्या कडक सुरक्षेत आमदारांना हॉटेल ताजवर आणण्यात आलं.
आगामी काळात अध्यक्ष महोदय असं कुणाला संबोधलं जाणार याचा निर्णय उद्या होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांनी अर्ज भरलाय. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा तास उरला असताना राजन साळवी यांनी अर्ज भरला. आता उद्या होणाऱ्या निवडणुकीत कुणाची सरशी होणार हे स्पष्ट होईल.
संबंधित बातम्या :
शिवसेना एक.... व्हिप दोन, विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी शिवसेना आमदारांना व्हीप जारी
Vidhansabha Speaker : विधानसभा अध्यक्षपदासाठी मविआकडून राजन साळवी मैदानात, नार्वेकर विरुद्ध राजन साळवी अशी लढत